Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अंमली पदार्थासह गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी तिघेजण पोलीस कोठडीत

पेठवडगाव / वार्ताहर : वडगाव-वाठार रस्त्यावरून भरधाव जाणार्‍या मोटारसायकलचा पाठलाग करून तिघा तरुणांकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व अंमली पदार्थ जप्त केल

भाजपने विरोधी मतांचे विभाजन करून हा विजय मिळविला : ना. जयंत पाटील
पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी बलाढ्य तर विकास आघाडीसमोर ऐक्याचे आव्हान
एसटीच्या संपामुळे टीईटी परीक्षेस 1634 गैरहजर

पेठवडगाव / वार्ताहर : वडगाव-वाठार रस्त्यावरून भरधाव जाणार्‍या मोटारसायकलचा पाठलाग करून तिघा तरुणांकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व अंमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी मनोज राजेंद्र खांडेकर (वय 20), अविनाश सतीश इंगळे (वय 19), आशितोष दिलीप साठे (वय 19, सर्व, रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड, जि. सातारा) या तिघांना वडगाव पोलिसांनी अटक केली.
वडगाव पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक शनिवारी पहाटे गस्त घालत असताना वडगावहून वाठारच्या दिशेने भरधाव विनानंबरची मोटारसायकल जात होती. संशयावरून पाठलाग करून वाठारजवळील सिमेंट फॅक्टरीजवळ पकडले. तिघांची अंगझडती घेतली असता एक गावठी बनावटीचे पिस्तूल, गांजाच्या दोन पुड्या, मोबाईल, चिलीम, मोटारसायकल असा एकूण 90 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिघांना वडगाव न्यायालयात हजर केले असता 13 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

COMMENTS