अहमदनगर/प्रतिनिधी : हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लागत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्यावतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. आरो
अहमदनगर/प्रतिनिधी : हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लागत नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्यावतीने पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. आरोपींची नावे देऊनही तपास लावला जात नसल्याचा आरोप करुन अपहरण झालेल्या मुलीची आई व समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी उद्या सोमवारी 13 जूनपासून पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
कोपरगाव शहरातून 2 जूनपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. याबाबत कोपरगाव पोलिस स्टेशनला मिसिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीच्या आईने संशय असलेल्या आरोपींची नावे पोलिसांनी दिली आहे. मात्र, अद्यापि मुलीचा तपास लागलेला नाही. वारंवार हेलपाटे मारून देखील पोलिस वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुलीच्या जीवाचे काही बरेवाईट झाले की काय, या चिंतेने मुलीचे कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना धमकी देणारे आरोपी दुसर्या दिवशी सापडून त्याला अटक केली जाते. मात्र, सर्वसामान्य कुटुंबातील अल्पवयीन मुलगी अनेक दिवस उलटूनही बेपत्ता असताना तिचा तपास लागत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातून हरवलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लावण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
—
COMMENTS