स्व.शंकरराव घुले यांनी कष्टकर्‍यांसाठी आपले जीवन समर्पित केले : पोपटराव पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व.शंकरराव घुले यांनी कष्टकर्‍यांसाठी आपले जीवन समर्पित केले : पोपटराव पवार

अहमदनगर: स्व.शंकरराव घुले यांनी हमाल-मापाडी यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर राज्यस्तरावर आवाज उठवून त्यांना त्यांचे हक्क मिळवून द

पाणी प्रश्न सोडविणारच, नगरपालिकेची सत्ता द्या : विकास करून दाखवतो – आ. आशुतोष काळे
भास्कर महाराज दाणे यांचे निधन
युवकांनी सोशल मीडिया वरून बाहेर पडत समाजासाठी ॲक्टीव हावे- जस्टिन मुसेल्ला

अहमदनगर: स्व.शंकरराव घुले यांनी हमाल-मापाडी यांचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर राज्यस्तरावर आवाज उठवून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिले. त्यामुळे कष्टकार्‍यांना प्रतिष्ठा मिळू लागली. त्याचबरोबर पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांची आर्थिक घडी बसविण्याचे काम करुन एकप्रकारे स्थैर्य निर्माण केले. त्यांचे कष्टकार्‍यांप्रती असलेले प्रेम व त्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता म्हणून जनमानसात त्यांची प्रतिमा नेहमीच उंचावत गेली. नगराध्यक्ष, कुस्तीपटू अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्यातून त्यांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले. त्यांनी कष्टकर्‍यांसाठी आपले जीवन समर्पित केले, त्यांची उणिव आपणा सर्वांना कायम जाणवत राहील. आता अविनाश घुले हे त्यांचा वारसा समर्थपणे चालवून कष्टकर्‍यांसाठी करत असलेले कार्यात आपणही सहभागी होवू. आज स्व.घुले यांच्या नावे दिला जाणारे पुरस्कार हे त्यांच्या कार्याचे प्रतिक कायम कष्टकर्‍यांना प्रेरणादायी राहील, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले.

    जिल्हा हमाल पंचायतचे माजी अध्यक्ष स्व.शंकरराव घुले यांच्या 70 व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय ‘गुणवंत कामगार पुरस्कारा’चे वितरण पद्मश्री पोपटराव पवार व आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गांधी, पेमराज पितळे, गोपाल मनियार, संतोष बोथरा, दिपक बोथरा, अनिल बोरुडे, संजय झिंजे, राजू बोथरा, कॉ.बाबा आरगडे, गोविंद सांगळे, मधुकर केकाण, पतसंस्थेचे चेअरमन बबन आजबे, व्हा.चेअरमन नारायण गिते, भैरु कोतकर, शेख रज्जाक शेख लाल आदि उपस्थित होते.

    याप्रसंगी आ.संग्राम जगताप म्हणाले, स्व.शंकरराव घुले हे आम्हास कायम मार्गदर्शक म्हणून राहिले आहे.  नगरपालिका असो, क्रिडा क्षेत्र असो किंवा हमाल पंचायत अशा विविध क्षेत्रातील त्यांचे कार्य प्रेरणादायी असेच आहे. सर्वांना बरोबर घेऊन हमाल-मापाडी, कष्टकार्‍यांच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून राज्यभर त्यांचा लौकिक होता. त्यांचा वारसा अविनाश घुले यशस्वीपणे पुढे चालवित आहेत. हाच वारसा आपण पुढे असाच चालवला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे सांगितले.

    प्रास्तविकात अविनाश घुले म्हणाले, स्व.शंकरराव घुले यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य हे नेहमीच आपणास मार्गदर्शक राहिले आहे. त्यांच्या विचाराचा वारसा चालविण्याचा आपण प्रयत्न करत असून, त्यासाठी पद्मश्री पोपटराव पवार, आ.संग्राम जगताप यांच्यासह हमाल, कष्टकर्‍यांचे मोठे सहकार्य मिळत आहे. त्यांचे विचार सर्वत्र पोहचविण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन कष्टकर्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले.

    प्रारंभी स्व.शंकरराव घुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय गुणवंत कामगार पुरस्कार विकास मुगदुम (सांगली) यांना तर जिल्हास्तरीय झुंबर आव्हाड (नगर), तालुस्तरीय पुरस्कार भागुजी काळे (श्रीगोंदा) यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्व.शंकरराव घुले माथाडी सहकारी पतसंस्थेच्यावतीने या गुणवंत कामगार पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने माऊली सेवा प्रतिष्ठानला 5 हजार रुपयांचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.

    सूत्रसंचालन प्रा.गणेश भगत यांनी केले तर आभार नारायण गिते यांनी मानले. कार्यक्रमास  विष्णूपंत म्हस्के, अशोकराव बाबर, बंट्टी गुंजाळ, अंबादास पंधाडे, जयंत येलूलकर, पिटू बोरा, अंबादास गारुडकर, अजय चितळे, जालिंदर बोरुडे, सुधीर टोकेकर, अनंत लोखंडे, निखिल वारे, अशोक लाटे, नंदू शिकरे, बाळासाहेब पवार, नवनाथ बडे, मच्छिंद्र दहिफळे, विष्णू ढाकणे, नंदू डहाणे, सुनिल गर्जे, लक्ष्मण वायभासे, अनुरथ कदम, संजय महापुरे, सुनिल गर्जे, राजु चोरमले, सतीश शेळके, अशोक कानडे, शाकिर शेख,संजय खामकर, मुरलीधर झिने, गौतम भांबळ, अर्शद शेख, अ‍ॅड.अजित वाडेकर, हरिश्चंद्र गिरमे, संजय घुले, आदिनाथ गिरमे, भाऊ पुंड, छबुराव कांडेकर, ज्ञानदेव पांडूळे, भिमराज कांडेकर, विलास कराळे आदिंसह हमाल-मापाडी, कष्टकरी, व्यापारी उपस्थित होते.

COMMENTS