Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माझी वसुंधरा अभियांना मध्ये दहिवडी नगरपंचायत राज्यात दुसर्‍या क्रमांकाची झेप

गोंदवले / वार्ताहर : दहिवडी नगरपंचायतीने पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठीच्या महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नगरपंचायत गटामध्ये

फलटण नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांचे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन
आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क
उपोषण करताच पाच तक्रारींचा झाला निपटारा; ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ; ग्रामसेवकाचे निलंबन

गोंदवले / वार्ताहर : दहिवडी नगरपंचायतीने पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठीच्या महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नगरपंचायत गटामध्ये राज्यात गेल्या वर्षीच्या गुणांच्या तुलनेत राज्यात दुसर्‍या क्रमांकाची वाढ करून मोठी झेप घेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल नगरपंचायतीचा मुंबईतील शानदार कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
मुंबई मध्ये झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे रविवारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगराध्यक्ष सागर पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, मुख्याधिकारी अवधूत कुंभार, नगरसेवक विशाल पोळ, रणजीत निकम यांनी पुरस्कार स्वीकारला.
पर्यावरण संवर्धनासाठी नगरपंचायतीने माणगंगा नदी पात्रात वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेतला होता. दहिवडी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वृक्षारोपण करून 10 एकर क्षेत्रात नवीन हरित पट्ट्याची निर्मिती केली. शहरातील घनकचरा व्यवस्थापनातल्या कचर्‍यापासून खत निर्मिती सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करून त्यांची लिलावातून विक्री करण्यात आली. जलसंवर्धन, अपारंपरिक ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने मिळकत धारकांना करामध्ये सवलत देण्याचेही ठरावाद्वारे निश्‍चित केले आहे. सेप्टी टँकमधील मैला हा प्लांटमध्ये प्रक्रिया करण्यात येतो. सन 2021 मध्ये दीपावलीत फटाके बंदी तसेच गणेश उत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनविण्यात आलेल्या मूर्तीवर बंदी व शाडू मातीच्या मूर्तीचा वापर, पिण्याच्या पाण्याच्या विहरींचे पाणी खराब होऊ नये. म्हणून गणपती दान योजना, प्रभाग एकमध्ये सायकल ट्रॅक आला. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन असे विविध उपक्रम नगरपंचायतीने राबवले.
दहिवडीमध्ये जनजागृतीसाठी पथनाट्य तसेच ध्वनीक्षेपकावरून जनजागृती करण्यात आली. अग्नी, वायू, जल, आकाश व भूमी या पंचमहाभूतावर आधारित कार्यक्रम दहिवडी नगरपंचायतीने घेतले आहेत. त्याची फलप्राप्ती म्हणून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमामध्ये दहिवडी नगरपंचायतीचा सन्मान करण्यात आला. गेल्या वर्षीच्या कामाची तुलना राज्यभर झाली. त्या तुलनेत दहिवडी नगरपंचायतीने मोठे काम उभे केले. तुलनेमध्ये केलेले काम हे राज्यात द्वितीय ठरले. म्हणून हा गौरव करण्यात आला.

COMMENTS