नवी दिल्ली : प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक,राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज उभय महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्
नवी दिल्ली : प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक,राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज उभय महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात तसेच कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात आमदार तथा राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री. जानकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अतुलनीय कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळयास व प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर यांच्यासह कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
COMMENTS