सुवेंदू अधिकारी यांच्या भावावर मतदानाच्या दिवशी हल्ला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुवेंदू अधिकारी यांच्या भावावर मतदानाच्या दिवशी हल्ला

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज राज्यातील एकूण 30 मतदारसंघांसाठी मतदान झाले.

टवेरा गाडीचा अपघात 1 ठार 3 जखमी 
चोरट्यांनी घरफोडी करून 13 ते 15 तोळे केले लंपास
तीन पिढ्या श्रमदान करताना पाहून आनंद वाटला ः जिल्हाधिकारी सालीमठ

कोलकाता :पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज राज्यातील एकूण 30 मतदारसंघांसाठी मतदान झाले. याच दरम्यान कांथी भागात भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचा भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप अधिकारी यांनी केला. 

’तृणमूल काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष राम गोविंद दास आणि त्यांची पत्नी यांच्या देखरेखीखाली तीन मतदान केंद्रांवर गोंधळ सुरू होता. जेव्हा मी तिथे पोहोचलो, तेव्हा त्यांना मनमानी करता येईना. त्यामुळे त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला आणि माझ्या गाडीच्या चालकाला मारहाण केली,’ आरोप सौमेंदू अधिकारी यांनी केला. या हल्ल्यात अधिकारी यांच्या गाडीच्या चालकाला दुखापत झाली. अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. यापूर्वी पश्‍चिम मिदनापूर जिल्ह्याच्या गारघेटा विधानसभा मतदारसंघातील माकपचे उमेदवार सुशांत घोष यांच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मतदानाची सुरुवात होण्याअगोदरच पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील भगवानपूर विधानसभा मतदारसंघ सतसतमलमध्ये गोळीबाराची घटना घडली. यामध्ये दोन सुरक्षारक्षक जखमी झाले. पश्‍चिम बंगालमध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्यात पुरुलियाच्या नऊ, बाकुडाच्या चार, झाडग्रामच्या चार, पश्‍चिम मिदनापूरच्या सहा जागांशिवाय पूर्व मिदनापूरच्या महत्त्वपूर्ण अशा सात जागांवर मतदान सुरू आहे. हा भाजप नेता सुवेंदू अधिकारी यांचा गड मानला जातो. 

COMMENTS