अनिल परब यांच्या घरी ईडीची छापेमारी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल परब यांच्या घरी ईडीची छापेमारी

मुंबई : महाराष्ट्रातील परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ईडीने गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परब यांच्या

बेळगावात फडणवीसांना दाखवले काळे झेंडे
महागाईचा भडका !
सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रात होणार हंगामी पद भरती

मुंबई : महाराष्ट्रातील परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ईडीने गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) परब यांच्या पुणे आणि मुंबईतील 7 ठिकाणांवर छापे टाकले आहेत. परब यांच्यावर कोट्यवधींची लाच घेतल्याचा आरोप असून, त्यामुळे ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने त्याच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला असून, त्याअंतर्गत त्याच्या 7 ठिकाणी कारवाई सुरू आहे. ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने ही कारवाई सुरू केली. परब यांनी जमीन खरेदीसाठी 1 कोटींची लाच घेतल्याच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) ही कारवाई केली आहे.

शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर व्यक्तींवर ईडीने छापेमारी सुरू केली आहे. ईडीने आतापर्यंत सात ठिकाणी छापेमारी केली आहे. ईडीने केलेल्या कारवाईमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.  आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला. या  कारवाईमध्ये ईडीचे वरिष्ठ अधिकारीदेखील सहभागी आहेत. अनिल देशमुख यांच्या तपासातील मुख्य तपास अधिकारी ईडीचे  सह-संचालक तासीन सुलतानदेखील अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान ‘अजिंक्यतारा’ येथे चौकशीसाठी दाखल झाले आहेत. 

COMMENTS