संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर नाकारली

शिवसेना आज ठरवणार आपला उमेदवार

मुंबई : राज्यसभेच्या 6 जागासाठी निवडणूक होत असून, यातील सहाव्या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. तसेच 6 व्या जागेवर महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा

दहा महिन्यांच्या बाळाचा बादलीत पडून मृत्यू
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार : अमित देशमुख
लिंपणगावमध्ये लाथा बुक्क्याने मारहाण करत शस्त्राने वार

मुंबई : राज्यसभेच्या 6 जागासाठी निवडणूक होत असून, यातील सहाव्या जागेवर शिवसेनेने दावा केला आहे. तसेच 6 व्या जागेवर महाविकास आघाडीने आपल्याला पाठिंबा द्यावा असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले होते. मात्र संभाजीराजे यांनी आधी शिवबंधन हाती घेत, पक्षात प्रवेश करावा, मगच संभाजीराजे यांना उमेदवारी देऊ असा पवित्रा शिवसेनेने घेतला होता. मात्र संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर नाकारत सोमवारी कोल्हापूरची वाट धरली. संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाला आता पूर्णविराम मिळाल्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना उद्या त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ज्येष्ठ शिवसैनिकाचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. तर येत्या 26 मे रोजी शिवसेना नेते संजय राऊत आणि उद्या जाहीर होणारे उमेदवार त्यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुसरीकडे संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर न स्वीकारल्यास अभिनेत्री उर्मिला मातोंडकर किंवा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याचा शिवसेना नेतृत्वाचा विचार आहे. तसंच संभाजी राजे शिवसेना पक्षात प्रवेश करणार नाही आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. संभाजीराजे यांचे चिरंजीव यांचा शिवसेना पक्ष प्रवेशासाठी विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. शहाजीराजे यांचा शिवसेना पक्ष प्रवेशसाठी विरोध आहे. संभाजीराजे यांना अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणूक लढवावी असे मत शहाजीराजे यांनी मांडले आहे.

COMMENTS