शेळी पालनातून महिलांना आर्थिक सक्षम करणार : मंत्री सुनील केदार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेळी पालनातून महिलांना आर्थिक सक्षम करणार : मंत्री सुनील केदार

नागपूर : ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराच्या संधीसोबतच आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी शेळीपालनातून महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत गोट बँकेच्या स

राज्यात 108 रुग्णवाहिकांची संख्या दुपटीने वाढणार
कुणाच्या म्हणण्यावर सेना चालत नाही; पूर्ण मुलाखत होऊ द्या.
वीजचोरी करणाऱ्या आठ ग्राहकाकडून एक लाखाच्यावर दंड वसूल

नागपूर : ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराच्या संधीसोबतच आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी शेळीपालनातून महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत गोट बँकेच्या सहकार्याने पाचशे महिलांना शेळीचे वाटप करण्यात येत असून या योजनेच्या यशस्वीतेनंतर ही योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. महिलांनी शेळी पालनाचा व्यवसाय करुन आर्थिक विकास साधावा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.

रामटेक तालुक्यातील अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या बोंद्री येथील प्रक्षेत्रावर गोट बँकेच्या सहकार्याने पाचशे महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. केदार बोलत होते. गोट बँकेच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारा महिलांना शेळी ‍वितरणाचा राज्यातील हा पहिला उपक्रम आहे. यावेळी पहिल्या शंभर महिलांना शेळीचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती चाफेश्वर वैद्य, महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोंडारे, महाराष्ट्र मत्स्य व पशुसंर्धन विद्यापीठाचे कुलगुरु आशिष पातुरकर, गोट बँक ऑफ कारखेड्याचे अध्यक्ष नरेश देशमुख, व्यंकटेश्वरा गोट बँकेचे प्रमुख सतीश भांडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शशांक पांडे, जिल्हा परिषद सदस्य दुधारामजी सव्वालाखे, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, उपविभागीय अधिकारी श्रीमती वंदना सरंगपते, सरपंच श्रीमती सुषमा भिमनवार, पंचायत समिती सभापती, लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

पशुपालन विशेषत: शेळी व मेंढी पालन करणाऱ्या एकाही शेतकऱ्याने विपरित परिस्थितीत आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता संपूर्ण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिले असल्याचे सांगताना पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार म्हणाले की, पशुधन हे लक्ष्मीधन म्हणून महिलांना गोट बँकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. महिलांनीही शेळीपालनाला प्राधान्य देऊन या व्यवसायाला यशस्वी करावे. अमूलच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाची मोठी चळवळ डॉ. कुरियन यांनी राबविली असून त्याच धर्तीवर राज्यात गोट बँकेच्या माध्यमातून शेळी व्यवसायाला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

शेळीपालनामध्ये बदलत्या परिस्थितीनुसार जास्त उत्पादन व लाभ देणाऱ्या प्रजाती विकसित करण्यात येत आहेत. पन्नास किलोपर्यंत वजन असलेल्या शेळीचे संगोपन करताना त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. शेळी वितरित करताना सोनोग्राफीसह तपासणी करण्यात येईल. तसेच घरपोच वैद्यकीय सुविधा देण्यात आली आहे. शेळीपासून दूध व मांस याला बाजारपेठेत मागणी वाढत असल्यामुळे निर्यातीलाही प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे म्हणाल्या की, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना शेळीचे वाटप करण्यात येत आहे. गोट बँकेमार्फत शेळी वितरित केल्यानंतर 36 महिन्यांनी त्याची चार पिल्ले बँकेला परत करायची आहेत. शेळीपालन हा महिलांसाठी रोजगाराचा व्यवसाय ठरत असल्यामुळे महिलांनीही बचत गट स्थापन करावा व शेळीच्या संगोपनासाठी जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.

गोट बँक ऑफ कारखेडाचे अध्यक्ष नरेश देशमुख यांनी बँकेच्या व्यवहाराप्रमाणे शेळीपालन करायचे आहे. यामध्ये बकरा चलन म्हणून वापरल्या जाणार असून महिला सदस्याने अर्ज केल्यानंतर त्यांना तात्काळ शेळीचे वितरण केले जाणार आहे. उमेद तसेच इतर बचत गटाच्या माध्यमातून शेळी वाटप तसेच त्यांची तपासणी व वसुली आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दुधारामजी सव्वालाखे, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर, व्यंकटेश्वरा गोट बँकेचे प्रमुख डॉ. सतीश भांडे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी शेळी विकास मंडळाचे व्यवस्थापकीय डॉ. शंशांक कांबळे यांनी मेंढीपासून तयार करण्यात आलेली घोंगडी व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. प्रास्तविकात गोट बँक ऑफ कारखेडा यांच्या सहकार्याने पाचशे महिलांना शेळी वितरित करण्यात येत असल्याचे सांगताना महांमडळामार्फत राज्यात प्रक्षेत्रात विविध रोजगाराभिमुख उपक्रम सुरु करण्यात आले आहे. शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतनाचा वापर उत्पादकता वाढविणे, शेळी मित्र ॲपचा वापर तसेच धनगर व मेंढपाळ यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे शेळीपालन व्यवसाय यावर डॉ. सारीपुत लांडगे, डॉ. जीवनकुमार चहांदे, डॉ. महेश जावळे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

COMMENTS