सातारचे राजे वाढदिवसानिमित्त कोरोनाचा लसीकरणाचे नियोजन करणार का?

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारचे राजे वाढदिवसानिमित्त कोरोनाचा लसीकरणाचे नियोजन करणार का?

जगभर कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे जगभरात अस्थिरता आली आहे.

राहुरी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांची रावळगाव येथील पवार बंधुंच्या प्रक्षेत्रास भेट
कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेऊन पुणे शहरातील निर्बंध शिथिल : अजित पवार
Nashik : मित्राला मिठी मारली म्हणून नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला | LOKNews24

सातारा / प्रतिनिधी : जगभर कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे जगभरात अस्थिरता आली आहे. अशा परिस्थिती लोकांनी गर्दी करून कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून सर्वत्र जाहिर समारंभातील उपस्थितीवर प्रशासनाने निर्बंध लादले आहेत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधीसह त्यांच्या कार्यकर्त्यांचे शक्ती प्रदर्शना करण्याचा क्षण म्हणजे लोकप्रतिनिधीचा वाढदिवस होय. सातारा-जावळी विधानसभा मतदार संघाचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे जाहीर करूनही गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील चौका-चौकात शुभेच्छांचे फलक झळकत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यास येणार्‍यांना राजांच्याकडून कोरोनाच्या लसीची भेट मिळणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर गर्दी टाळण्यासाठी राजांनी जाहिर केले. मात्र, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता वाढदिवसानिमित्त कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे उपाय अंमलात येणार का? राजे कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ घेणार की कोरोना लसीकरणाच्या मोहिमेच्या नियोजनाचे लेखी हमी पत्र घेणार? लोकप्रियेतेमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी पत्रक काढून उपयोग होणार का?, असे अनेक अनुत्तरीत प्रश्‍न उपस्थित होत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाची लस घेण्यास आलेल्या लोकांना नाष्टा-फळे वाटप करण्यापेक्षा कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याचे राजांनी धारिष्ठ दाखवायला पाहिजे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर सातारा-जावळीचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वाढदिवसानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी वाढदिवस साजरा करणार नसल्याचे पत्रकाद्वारे जाहिर करून टाकले होते. मात्र, त्यांच्याच कार्यालयातून सर्व वर्तमानपत्रांच्या कार्यालयांना राजांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख आठ दिवस आधीच पाठवून दिला आहे. यामधून राजांची नेमकी काय भूमिका आहे हेच समजले नाही. याच दरम्यान सातारा शहरातील चौकाचौकात राजांना शुभेच्छा देणारे फ्लेक्स बोर्ड गेल्या 15 दिवसापासून झळकत आहेत. काही फलक शासकीय जागेवर होते, ते फलक नगरपालिकेच्या संबंधित विभागाने हटविले. मात्र, खासगी जागांवर असलेले फलक झळकत आहेत. 

एकंदरीत शासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून कोरोना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. शासन स्तरावर कोणतीही योजना राबविताना अनेक अडचणी येत असतात. सेवाभावी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लसीकरण मोहिम राबविल्यास त्यास गती येईल. तसेच लोकांमध्येही सुरक्षिततेची भावना निर्माण होईल. जागतिक स्तरावर सुरु असलेल्या या मोहिमेस लोकप्रतिनिधींनी योगदान दिल्यास गती येण्यास मदत होईल. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर लोकांना अन्न-धान्यासह अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी लोकप्रतिनिधी व त्यांचे कार्यकर्ते आघाडीवर होते. त्याचप्रमाणे लसीकरण मोहिमेसाठीही लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सातारच्या दोन्ही राजांची लोकप्रियता आहे. ही लोकप्रियता टिकविण्यासाठी सातारचे राजे वाढदिवसानिमित्त कोरोनाचा लसीकरणाचे नियोजन करणार का? सार्वजनिक ठिकाणी होणारा संसर्ग रोखण्याचे उपाय अंमलात आणणार का? राजे कार्यकर्त्यांकडून पुष्पगुच्छ घेणार की कोरोना लसीकरणाच्या मोहिमेच्या नियोजनाचे लेखी हमी पत्र घेणार? लोकप्रियेतेमुळे होणारी गर्दी टाळण्यासाठी पत्रक काढून उपयोग होणार का? असे अनेक प्रश्‍न आहेत. 

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणार्‍यांना रक्तदान शिबिराप्रमाणे कोरोना लसीकरण मोहिम कारखाना अथवा तत्सम संस्थांच्या माध्यमातून आखल्यास लसीकरणाची मोहिम गती घेवू शकते. शासनाला सध्या लसीकरण मोहिम राबविण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध करताना दमछाक होत आहे. त्यामुळे लसीकरणाच्या कामास म्हणावा तसा जोर नाही. मात्र, हीच मोहिम लोकप्रतिनिधींनी हाती घेतल्यास त्यास गती येईल. कोरोना बाधितांना वेळेत योग्य उपचार मिळावे म्हणून ज्या प्रमाणे परिसरातील मंगल कार्यालये ताब्यात घेऊन किंवा मंगल कार्यालयाच्या मालकांना विनंती करून कोरोना केअर सेंटर सुरु करण्यात आली होती. त्याच धर्तीवर कोरोना लसीकरण केंद्रे सुरु केल्यास लसीकरण मोहिमेला गती येईल. सातारा-जावळीचे आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांच्या स्वत:च्या पुष्कर मंगल कार्यालयात कोरोना केअर सेंटर सुरु केले होते. त्याच धर्तीवर कोरोना लसीकरण केंद्र सुरु केल्यास लसीकरण मोहिमेस गती येईल. 

सध्या कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे लोकांचे जीवन अस्थिर झाले आहे. अशा परिस्थितीत सातारा शहरातील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाची लस घेण्यास आलेल्या लोकांना नाष्टा-फळे वाटप करण्यापेक्षा वाढदिवसानिमित्त कोरोना लसीकरण केंद्र सुरु करण्याचे राजांनी धारिष्ठ दाखवायला पाहिजे. ज्याची आज समाजाला गरज आहे, अशा कामाला हातभार लावल्यास त्याचा भविष्यात चांगलाच फायदा होईल. आ. भोसले यांनी मनात घेतल्यास हे काम त्यांच्यासाठी किरकोळ आहे, असेही त्यांचे कार्यकर्ते नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर बोलत आहेत. त्यामुळे फक्त कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची गरज असल्याचे यामधून दिसून येत आहे.

COMMENTS