अहमदनगर यतीमखाना संस्थेतील माजी विद्यार्थी 30 वर्षानंतर आले एकत्र

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर यतीमखाना संस्थेतील माजी विद्यार्थी 30 वर्षानंतर आले एकत्र

शहापूर सोसायटी चेअरमनपदी घारे तर व्हा. चेअरमनपदी डांगे
बंद केलेले पाणी टँकर पुन्हा चालू करा
शेवगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन
                                                                                                                                                                                                        अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर यतीमखाना ही संस्था मरहूम अलहाज शेख अब्दुल गनी इमाम सहाब (गनी हजरत ) यांनी अथक प्रयत्नाने सन १९६४ मध्ये अहमदनगर शहरातील  दानशुर व्यक्तीच्या सहकार्यातून  सुरवात करून अनाथ मुलाचे पालकत्व स्वीकारून अनेक मुलांचे भवितव्य घडविले . संस्थेचे अध्यक्ष आलिमभाई हुंडेकरी, संस्थेचे संचालक शाकीर शेख,  विश्वस्त अँड.फारूक बिलाल शेख यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून संस्थेत अनेक बद्दल घडविले. तर संस्थेतील विश्वस्थ संचालक मंडळाच्या प्रयत्नातून संस्थेमध्ये स्वयंपाकासाठी आधुनिक यंत्र सामुग्री, वस्तीगृहात अनेक सुविधा, आरोग्याविषयी तत्परता देत शिक्षणाबरोबर धार्मिक अध्ययन, आधुनिक  तंत्रज्ञानाचा समावेश करून अनेक अनाथ मुलांना उच्चपदापर्यंत पोहोचविण्याचं काम करत आहे, अनेक, शिक्षक, वकील, पोलीस, आरोग्य विभाग, आधुनिक तंत्रज्ञान अशा अनेक विभागात कायर्रत आहे .                               अहमदनगर यतीमखाना संस्थेतील सुमारे 30 वर्षीपूर्वीच्या माजी विद्यार्थ्यांकडून ईदच्या निमित्ताने जश्ने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थेंचे संचालक शाकीर शेख, विश्वस्त फारुख बिलाल शेख व मौलाना सईद अहमद यांच्या उपस्थित   कार्यक्रमाची सुरूवात मौलाना सईद अहमद यांनी कुराण वाचनाने केली. तर अँड. फारूक बिलाल शेख यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या सुरुवाती पासून अनेक अडीअडचनींना सामोरे जाऊन कसे आधुनिक तंत्रज्ञानाने वैभव प्राप्त केले.  संस्थेचे संचालक शाकीर शेख यांनी आपल्या भाषणात संस्थेत काम करताना समाजातील दानशुर मित्र परिवारकडूनं मिळालेली मदत घेऊन अधिक चांगले काम करून मुलांना येणाऱ्या समस्यां अड़चनी सोडण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत. कौशल्य प्रशिक्षण देऊन मुलांना मानसिक दुष्ट्या सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहेत, तसेच माजी विद्यार्थ्यांनी  संस्थेत येऊन मुलाना वेळ देऊन मार्गदर्शन करावे अशी आशा व्यक्त केली.  

मुस्कान शेख या विद्यार्थीनीनी संस्थेतील सुखसुविधा बद्दल आनंद व्यक्त केला तसेच माजी विद्यार्थीं शेख शकील भाई पुणे, सय्यद शाहनवाज कर्नाटक, नाईक नसीम पुणे, सय्यद आयेश जामखेड, शेख नजमा यांनी संस्थे बद्दल कृतद्न्य व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थीं कडुन संस्थेतील मुलांना बेडशीट व चादर भेट दिल्या व स्नेहभोजन केले. यावेळी पाहुण्यां बरोबर संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता संस्थेतील सर्व संचालक विद्यार्थी व सर्व मानव जातीसाठी मौलाना सईद अहमद यांनी (प्रार्थनेने) करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सय्यद शाहनवाज व बेग नसीम मुंबई यांनी अतिशय सुंदर रित्या सादर केले.

COMMENTS