देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांना राहुरी तालुक्यातील गुहा येथील एक महिला आरोपी पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत अस
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांना राहुरी तालुक्यातील गुहा येथील एक महिला आरोपी पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत असल्याचे खात्रीशिर माहिती मिळाली. त्यावरुन त्या ठिकाणी छापा मारला असता तीन पिडीत परप्रांतीय महिलांची सुटका केली असून एका महिला आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन मध्ये पिटा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन गुहा येथे बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन तीन पिडीत परप्रांतीय महिलांची सुटका केली असून एक महिला आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन येथे प्रचिलीत कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुहा गावातील भर मध्यवस्तीत वेशा व्यवसाय सुरू होता व त्याची माहिती गावातील नागरिकांना नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईमुळे पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके व पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकाचे गावातील वेश्या व्यवसायचा अड्डा उध्वस्त केल्यामुळे स्थानिक
नागरिकांकडून कौतुक केले जात आहे
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील, साहय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, हे.काँ.सुरेश औटी, सोमनाथ जायभाये, लक्ष्मण बोडखे, पो.ना.विकास साळवे, पो. कॉ. नितीन शिरसाठ, पो. कॉ. आजिनाथ पाखरे, रविंद्र कांबळे, म.पो.कॉ. तृप्ती गुणवंत आदींनी कारवाईत भाग घेतला.
COMMENTS