नवनीत राणा जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवनीत राणा जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई/प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या राणा दाम्पत्याला मुंबई

जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण
मुंबईत लोकलमध्ये महिलेने दिला बाळाला जन्म
संजय अमोलिक यांचा अध्यापन कार्यगौरव पुरस्काराने गौरव

मुंबई/प्रतिनिधी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालेल्या राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केले होते. तब्लब 12 दिवसानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याला राजद्रोह प्रकरणी बुधवारी मोठा दिलासा मिळाला. मुंबई सेशन कोर्टाने अखेर राणा दाम्पत्याची जामिनावर सुटका केली. मात्र, कोर्टाने जामीन देताना काही अटी देखील ठेवल्या आहेत.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी प्रत्येकी 50 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. याशिवाय राणा दाम्पत्याला माध्यमांशी बोलण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याप्रकरणी खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर समाजात तेढ निर्माण करणे आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याने जामिनासाठी मुंबई कोर्टात धाव घेतली होती. मुंबई कोर्टाने जामीन अर्जावर सुनावणी करताना अखेर बुधवार राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर केला. खासदार नवनीत राणा यांना स्पाँडिलायसिस असून त्यांच्या जीवाला काही झालं तर तुरुंग अधिकारी जबाबदार असतील, असे पत्र राणांच्या वकिलांना भायखळा तुरुंग अधीक्षकांना लिहिले होते. नवनीत राणा यांची रवाणगी तुरुंगात झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी जमिनीवर झोपायला लावले. त्यात त्यांना स्पाँडिलायसिसचा आजार आहे. जमिनीवर झोपल्यामुळे त्यांचा आजार अधिक बळावला आहे. त्यांना उपचाराची आवश्यकता आहे. पोलिस त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत आहे. विशेष म्हणजे वकिलांनी दिलेल्या अर्जाची एक प्रत लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना देखील पाठवण्यात आली होती. त्यानंतर आज नवनीत राणा यांना जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.

COMMENTS