पारनेर तालुका शिक्षण क्षेत्रात अग्रेसर ठरेल.  –  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेर तालुका शिक्षण क्षेत्रात अग्रेसर ठरेल. – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

अहमदनगर : फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरूमसारख्ये उपक्रम महाराष्ट्रासह इतर राज्यांना दिशादर्शक ठरणार आहे. या उपक्रमामुळे पारनेर तालुका शिक्षणात अग्रेसर

मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींची विभागीय पातळीवर निवड
संगमनेर तालुक्यातील पर्यटन विकासासाठी 3 कोटीचा निधी मंजूर
कर्जतमध्ये मराठा आरक्षणासाठी रास्तारोको

अहमदनगर : फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरूमसारख्ये उपक्रम महाराष्ट्रासह इतर राज्यांना दिशादर्शक ठरणार आहे. या उपक्रमामुळे पारनेर तालुका शिक्षणात अग्रेसर ठरेल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज पारनेर तालुक्यातील पानोली येथे केले.

पारनेर तालुक्यातील पानोली येथे कमींन्स इंडिया आणि नाबार्ड यांच्या सहकार्यातून आणि लोकसहभागातून फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी परिसरातील विविध विकास कामांचे लोकार्पण पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. आमदार निलेश लंके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, शिक्षण संचालक दिनकर टेमकर, पानोलीचे सरपंच शिवाजी शिंदे उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्हा परिषदेला प्राप्त झालेल्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून विद्यार्थ्यांचा विकास घडविणा-या नाविन्यपूर्ण योजना राबवाव्या. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या अध्यापन आणि अध्ययनात सकारात्मक बदल घडेल. विद्यार्थ्याच्या कल्पनांना आकांक्षेचे बळ मिळेल.
समाजातील गरीब घटकांना शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळवून द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. असंघटित कामगारांचे जीवन परिपूर्ण होण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचे सांगून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

आमदार निलेश लंके यांनी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून तालुक्याचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला ग्रामस्थ, पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तत्पूर्वी पारनेर येथे आयोजित शिक्षक मेळाव्याचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. आमदार निलेश लंके, संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पानोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नेताजी सुभाष चंद्र बोस माध्यमिक विद्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरूमचे वैशिष्ट्ये—
• 30 विद्यार्थी क्षमतेची फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरुम.
• ‘ट्रान्सफॉर्मशेन आॅफ टेक्नोलॉजी इन टू एज्युकेशन’ या संकल्पनेवर आधारित अभ्यासक्रम.
• ‘टेक्नॉलॉजी एनहान्सड् लर्निग’ संकल्पना.
• मुलांच्या डिजीटल शिक्षण प्रगतीचे आॅनलाईन माॅनिटरींग.
• विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अॅक्टीव्हीटीचे डिजीटल पध्दतीने नियंत्रण.
• आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत. राज्यात चार ठिकाणी अशा प्रकारच्या क्लासरुमची सुरुवात.
सुमारे आठ कोटी अडुसष्ट लक्ष रुपये निधीतून लोकार्पण करण्यात आलेली विकास कामे—
• पानोली ते गटेवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे-३ कोटी ७५ लक्ष रुपये.
• पानोली ते कान्हुर चौक, पारनेर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे-३ कोटी रुपये.
• मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत पानोली पाझर तलाव १ व २ दुरुस्ती करणे-७० लक्ष २७ हजार रुपये.
• पानोली दलित वस्ती अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे-२८ लक्ष रुपये.
• पानोली अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती अंतर्गत भुमिगत गटार व रस्ता काँक्रिटीकरण करणे-२१ लक्ष रुपये.
• मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत योजनेअंतर्गत इमारत बांधकाम करणे-१५ लक्ष रुपये.
• जिल्हा क्रिडा विभागअंतर्गत व्यायामशाळा साहित्य १५ वा वित्त आयोग अंतर्गत लोखंडी पाईप लाईन भैरवनाथ गल्ली ते वडुले रोड-६ लक्ष २५ हजार रुपये.
• पानोली जनसुविधेअंतर्गत मगर वस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे-१४ लक्ष ७० हजार रुपये.
• जनसुविधेअंतर्गत पानोली स्मशानभुमी विकास करणे-५ लक्ष रुपये.
• १५ वित्त आयोग योजनेअंतर्गत लोखंडी पाईप लाईन मगर वस्ती व राम गल्ली तयार करणे-६ लक्ष रुपये.

COMMENTS