सत्र न्यायाधीशांच्या विरुद्ध सरन्यायमूर्तींकडे तक्रार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सत्र न्यायाधीशांच्या विरुद्ध सरन्यायमूर्तींकडे तक्रार

दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाचे सत्र न्यायाधीश संजय खनगवाल यांचे वागणे असंवेदनशील, अनुचित आणि क्लेशकारक असल्याची तक्रार सरन्यायमूर्ती शरद बोबडे यांच्याकडे करण्यात आलीय.

लहान मुलांचा शोषण केल्या प्रकरणी आमदार नारायण कुचे व भाजप कार्यकर्त्यावर कारवाई करण्याची मागणी 
अदानी प्रकरणात लपवण्यासारखे काहीही नाही
टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणित विजय

 नवी दिल्ली : दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाचे सत्र न्यायाधीश संजय खनगवाल यांचे वागणे असंवेदनशील, अनुचित आणि क्लेशकारक असल्याची तक्रार सरन्यायमूर्ती शरद बोबडे यांच्याकडे करण्यात आलीय. एका टीव्ही पत्रकारावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या तरुणीने ही तक्रार करून सत्र न्यायाधीशांच्या वर्तनाकडे लक्ष वेधले. 

सरन्यायमूर्तींना 11 मार्च रोजी पाठवलेल्या तक्रार पत्रात नमूद केल्यानुसार पिडीत तरुणीने इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि कैद करून ठेवल्याचा आरोप केला आहे. यावर्षी फेब्रुवारीच्या उत्तरार्धात हा खटला दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी पत्रकार फरार आहे. या पत्रात पिडीतेने 10 मार्च रोजी पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन सुनावणीचा संदर्भ दिला आहे. तिने सांगितले की, “सुनावणीच्या वेळी, आरोपीचे प्रतिनिधीत्व करणारे वकील अग्रवाल यांनी वारंवार माझ्याविरूद्ध खोटी, अपमानास्पद अशी गंभीर टीका केली आणि मला हीन वागणूक दिली. अग्रवाल यांना फटकारण्याऐवजी आणि त्यांना असे करण्यापासून रोखण्याऐवजी न्यायाधीश संजय खानगवाल मझ्यावर अनेकवेळा हसले.” आरोपीच्या वकीलांची वागणूक “भयानक क्लेशकारक” होती परंतु न्यायाधीशांची वागणुकसुद्धा तशीच आहे यावरून ती अधिक जास्त धक्का बसला. अग्रवाल यांच्या वक्तव्यांनी माझ्या चारित्र्याचे हनन झाले आहे. तर न्यायाधीशांनी त्यांच्या घाणेरड्या युक्तिवादांवरून हसून माझे दु:ख आणखीनच वाढवले आहे.” “बलात्काराच्या घटनेनंतर माझा मानसिक त्रास झाला आणि या सगळ्या परिस्थितीमध्येसुध्दा मी पोलिसांकडे गेले व तक्रार दाखल केली, का तर आरोपीला जबाबदार धरले जावे. त्यासाठी मी या तक्रारीचा पाठपुरावा देखील केला होता. तथापि, या प्रकरणातील अटकपूर्व जामिनावरील सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या असंवेदनशील, अनुचित आणि क्लेशकारक वागण्यामुळे, माझे दु:ख आणि मानसिक आघात आणखी तीव्र झाले आहेत. काल झालेल्या घटनांमुळे फौजदारी न्याय प्रणालीच्या कामकाजावरील माझा विश्वास पूर्णपणे डळमळला आहे. सर, मला न्याय मिळाल्याच्या निरर्थक आशेने माझ्या तक्रारीचा पाठपुरावा केल्याबद्दल मला वाईट वाटत असल्याचे पिडीतेने आपल्या पत्रात नमूद केले.

COMMENTS