आंबेडकरी तरूणांवरील गुन्हे मागे घ्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंबेडकरी तरूणांवरील गुन्हे मागे घ्या

अहमदनगर/प्रतिनिधी : समस्त आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने 14 एप्रिल रोजी शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये काही समाजकंटकांकडून अनुच

सधन व्यक्तींनी अन्नसुरक्षा योजनेतून बाहेर पडावे : तहसीलदार पाटील
जिल्हा रुग्णालय जळीतकांड ; जबाबदारी टाळणे, हा सुद्धा गुन्हाच ; पोलिसांचा युक्तिवाद, चौघींना पोलिस कोठडी
राहुरी फॅक्टरी फातिमा माता चर्चच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

अहमदनगर/प्रतिनिधी : समस्त आंबेडकरी समाज बांधवांच्या वतीने 14 एप्रिल रोजी शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये काही समाजकंटकांकडून अनुचित प्रकार घडला या प्रकरणाची योग्य चौकशी करून त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच मिरवणुकीमध्ये सहभागी असलेले मिलिंद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांवर ती देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आंबेडरी समाजबांधवांच्या वतीने पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे करण्यात आली. यावेळी आंबेडकरी चळवळीतील नेते अशोक गायकवाड, अजय साळवे, सुरेश बनसोडे, परिमल निकम, सुशांत म्हस्के, सुमेध गायकवाड, महेश भोसले, नितीन कसबेकर, रोहित आव्हाड, विशाल भिंगारदिवे, विशाल गायकवाड, तुकाराम गायकवाड, विजय भांबळ, नितीन साळवे, विनोद साळवे, आकाश गायकवाड, अजय शेळके, कौशल गायकवाड आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शहरातून काढण्यात आलेली मिरवणुकीमध्ये तक्ती दरवाजा आशा टॉकीज चौक या ठिकाणी मिरवणुकीमध्ये सामील असलेले मिलिंद तरुण मंडळ मंगलगेट या मंडळामध्ये अज्ञात समाजकंटकांनी मिरवणुकीत घुसून विनापरवानगी दहशतीने नाचत आक्षेप आर्य घोषणाबाजी केली त्यामुळे मिलिंद तरुण मंडळाचा काहीही संबंध नसून मंडळाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यामुळे पोलीस प्रशासनाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून ज्या समाजकंटकांनी अनुचित प्रकार घडविला व परिसरामध्ये ज्या युवकांनी जय श्रीराम या घोषणा दिल्या व प्रतीउत्तरात ज्या युवकांनी मुस्लिम धर्माच्या घोषणा दिल्या. त्या दोन्ही युवकांचा मिलिंद तरुण मंडळाशी कुठलाही संबंध नाही. मंडळाचे कार्यकर्ते फक्त बाबासाहेबांच्या नावानेच घोषणा देतात. या प्रकरणाची योग्य चौकशी होऊन मिलिंद तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे व खर्‍या आरोपींवर योग्य ती कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणीचे निवेदन देण्यात आले.

COMMENTS