Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर पायी प्रवास

नागठाणे / वार्ताहर : बोरगाव, ता. सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ढाणे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी कोल्हापूर येथे पायी चालत ज

शाहुनगरी फौंडेशनचा महाराणी येसूबाई पुरस्कार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना जाहीर
कोयना जलाशयावर पाटण तालुक्यातील मुनावळे येथे जलपर्यटन विकसित करण्यास मंजुरी
तांबवे येथील डॉ. शलाका पाटील यांना पीचडी

नागठाणे / वार्ताहर : बोरगाव, ता. सातारा येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय ढाणे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी कोल्हापूर येथे पायी चालत जाऊन खा. संभाजीराजे छत्रपती यांना भेटणार आहेत. दत्तात्रय ढाणे हे बोरगावसह नागठाणे परिसरातील गावांत विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवत असतात. सरसेनापती धनाजी जाधवराव प्रतिष्ठानच्या माध्यमातूनही त्यांचे सामाजिक उपक्रम सुरू असतात. बेटी बचाओ अभियानात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
बोरगाव परिसरात त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाविषयी समाजात जाणीव अन् जागृती निर्माण होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोना काळातही त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांना मोठे सहकार्य केले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ते उद्या पायी चालत कोल्हापूरला जाणार आहेत. तेथे ते खा. संभाजीराजे छत्रपती यांना भेटणार आहेत. मराठा आरक्षण त्वरित लागू करण्यात यावे. या मागणीचे निवेदन ते खासदार संभाजीराजेंना देणार आहेत. या वेळी नागठाणे, बोरगाव भेटीचे आमंत्रण देण्यात येणार असल्याचे ढाणे यांनी नमूद केले. उद्या पहाटे पाच वाजता ते नागठाण्यातून कोल्हापूरकडे प्रस्थान करणार आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते मधुअण्णा खुळे, सचिन साळुंखे, अनिल साळुंखे, दत्तात्रय कुलकर्णी तसेच कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

COMMENTS