Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘आरटीई’ची सोमवारी निवड व प्रतीक्षा यादी

सातारा : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुला-मुलींसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑ

चांदोली धरणातून 3800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
कृष्णा-कोयना नदीची पात्रे पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात
इस्लामपूरातील प्रभाग 11 मध्ये काट्याच्या लढती…?

सातारा : आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील मुला-मुलींसाठी खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये आरटीईअंतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली आहे. या प्रक्रियेत लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी व प्रतीक्षा यादी सोमवार, दि. 4 रोजी आरटीईच्या पोर्टलवर जाहीर होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज भरण्यास 25 फेब्रुवारीपासून सुरवात झाली होती. या प्रक्रियेत जिल्ह्यात 227 शाळांची नोंदणी झाली असून, एकूण 5 हजार 361 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज आले आहेत.
दरवर्षी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होते. मात्र, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात खासगी शाळांनी नोंदणी करण्यासाठी टाळाटाळ केल्याने प्रवेश प्रक्रियेला उशिरा सुरवात झाली आहे. या कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे लागत असल्याने शाळांनी चालढकलपणा करण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, यंदा शाळांनी वेळेत नोंदणी न केल्याने प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली होती. त्यामुळे आरटीईअंतर्गत एक फेब्रुवारीऐवजी 16 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सातारा जिल्ह्यात 25 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. जिल्ह्यात आरटीईअंतर्गत एकूण 227 शाळांची नोंदणी असून, 1 हजार 931 जागा भरण्यात येणार आहेत.
त्यातील एकूण 5 हजार 361 विद्यार्थ्यांच्या अर्जाची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 7 मार्चपर्यंत होती. त्यानंतर ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली असून, पुढील प्रक्रियेस सोमवारपासून सुरुवात होणार आहे.
सातारा जिल्ह्यातील चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन लॉटरी काढण्यात आली आहे. पुढील प्रवेश प्रक्रियेतील निवड यादी व प्रतीक्षा यादी ऑनलाईन पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रियेस सुरुवात होणार असल्याचे प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी सांगितले.

COMMENTS