देहूमध्ये मांस आणि मासे विक्रीला बंदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देहूमध्ये मांस आणि मासे विक्रीला बंदी

पुणे : संत तुकारामांचे जन्मस्थान असलेल्या देहूमध्ये आजपासून पुन्हा एकदा मांस आणि मासे विक्रीला बंदी करण्यात आली आहे. हा निर्णय नगरपरिषदेच्या वतीने घे

मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचा एल्गार
15 हजारची लाच स्विकारल्या प्रकरणी गटविकास अधिकार्‍यासह शिक्षकास अटक
समृद्धी महामार्गाच्या कामावरील अपघातात 13 मजुरांचा मृत्यू

पुणे : संत तुकारामांचे जन्मस्थान असलेल्या देहूमध्ये आजपासून पुन्हा एकदा मांस आणि मासे विक्रीला बंदी करण्यात आली आहे. हा निर्णय नगरपरिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. नवनिर्मित देहू नगरपरिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून आजपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. याआधी ग्रामपंचायतीने सुद्धा हा निर्णय घेतला होता. मात्र, ग्रामपंचायत बरखास्त झाली आणि त्यानंतर कोरोनाची साथ सुरु झाली. त्यामुळे गेली दोन वर्षे हा निर्णय बारगळलेल्या अवस्थेतच राहिला होता. प्रशासक असताना मांसविक्री पुन्हा एकदा सुरु झाली होती. त्यानंतर आता नगरपरिषद स्थापित झाल्यानंतर हा बंदीचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे.

COMMENTS