Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे

इस्लामपूर : महावितरणच्या कार्यालयास टाळे ठेकताना स्वाभिमानी संघटनेचे भागवत जाधव, रविकिरण माने, शिवाजी पाटील, प्रदीप माने. इस्लामपूर / प्रतिनिधी :

मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे सुवर्ण पदकाने सुजित देशमुख सन्मानीत
अवकाळी पावसाने माण तालुक्यात फळबागांचे करोडोचे नुकसान
प्रवरेच्या कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये पेरू दाब कलम कार्यशाळा संपन्न

इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुक्यातील शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेत आज वीज वितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. वाळवा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने आक्रमक भूमिका घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुढाकार घेत आंदोलन केले. तासभराच्या आंदोलनानंतर वीज पूर्ववत सुरू केली.
यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव म्हणाले, खिा. राजू शेट्टी यांनी गेली तेरा दिवस महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या व धरणे आंदोलन करण्यात आले होते. वाळवा तालुक्यातील शेतीचे वीज बील दुरुस्ती केल्याशिवाय एक गिण्णा सुध्दा भरणार नाही. होणार्‍या रोषाला महावितरण जबाबदार राहिल शेतकर्‍यांनी ताबडतोब वीज बीले दुरुस्ती करूण घ्यावे.
इस्लामपूर उपविभागाचे उपअभियंता एस. बी. कारंडे यांची गाडी रोखली महावितरणच्या कार्यालयाला कुलपे लावली शेतकर्‍यांनी मोठ्या घोषणाबाजी करण्यात आली उपअभियंता एस. बी. कारंडे म्हणाले, वीज बिल दुरुस्तीसाठी गाव निहाय मेळावे घेतले जाणार आहेत.यात शेतकर्‍यांनी आपली वीज बिले दुरुस्त करून घ्यावीत.
आंदोलन सुरू असताना या वाळवा तालुक्यातील ताबंवे, धोत्रेवाडी, येवलेवाडी, कासेगाव, नवेखेड, जुनेखेड, शिरगाव, वाळवा, भवानीनगर, बिचुद, येडेमच्छिंद्र या गावातील वीज जोडण्या व विद्युत प्रवाह खंडित केलेली डीपी सुरू करण्यात आला. तसेच लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले. यावेळी भागवत जाधव, रविकिरण माने, ब्रम्हानंद पाटील, शिवाजी पाटील, एस. यू. संदे, शिवाजी मोरे, अधिक जाधव, संजय पाटील, अवधूत जाधव, प्रदीप माने, अवधूत पाटील, किरण पाटील, किरण सुतार, रमेश पाटील, सुभाष शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS