Homeमहाराष्ट्रसातारा

कराड आयटीआय कॉलेजची 12 लाखाची थकबाकी; 15 दिवसापूर्वीच वीज कनेक्शन तोडले

विद्यानगर (ता. कराड) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जवळपास 12 लाख रुपये लाईट बिल थकल्याने गेल्या 15 दिवसांपूर्वी वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे.

पतंजली योग समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव साजरा
’पिपाणी’ निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळा
दिल्लीगेट ते लालटाकी रस्त्यावरील पथदिवे सुरु न केल्यास पालिकेच्या वीज कनेक्शनचा फ्युज घालविणार : गिरीश जाधव

विद्यार्थ्यांच्या हितासाठी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांचा आंदोलनाचा इशारा

कराड / प्रतिनिधी : विद्यानगर (ता. कराड) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे जवळपास 12 लाख रुपये लाईट बिल थकल्याने गेल्या 15 दिवसांपूर्वी वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. वीज कनेक्शन तोडले गेल्याने प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. येत्या सात दिवसात बिल भरून वीज कनेक्शन न जोडल्यास जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

सागर शिवदास म्हणाले, विद्यानगर येथील आयटीआय कॉलेज हे कौशल्य विकास मंत्री यांच्या अंतर्गत असते. गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे हे खाते आहे. तसेच ही प्रशिक्षण संस्था सहकारमंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मतदारसंघात असून या शासनाच्या संस्थेचे वीज कनेक्शन तोडले जाते हे दुर्दैव आहे. या प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन व्यवसायिक बनण्याचे स्वप्न बाळगून विद्यार्थी येथे प्रवेश घेत असतात. 

या संस्थेत ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहे. दूरवरून येणार्‍या विद्यार्थ्यांना वीज नसल्यामुळे प्रशिक्षण देणारी यंत्रे बंद अवस्थेत पडून आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान शासनाने व कॉलेजच्या व्यवस्थापनाने टाळावे. येत्या सात दिवसात विज बिल भरून विज कनेक्शन न जोडल्यास मी स्वतः उपोषण करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनी सांगितले.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत लाईट बिल थकल्याने वीज कनेक्शन तोडले असले, तरी प्रशिक्षण संस्थेतील कार्यालयात, शिक्षकांच्या स्टाफ रूममध्ये जनरेटरचा वापर करून लाईट, फॅन, कम्प्युटरचा वापर चालू आहेत. मात्र, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या यंत्रांना विद्युत पुरवठा केला जात नाही. प्रशिक्षणार्थींसाठी संस्थेत असलेली यंत्रे केवळ वीज पुरवठा नसल्याने बंद अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थी घरातून संस्थेत येत आहेत. मात्र, प्रशिक्षण न घेताच शिक्षणापासून वंचित राहून, पुन्हा घरी परत येत आहेत. या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान होत आहे.

COMMENTS