तीन भावंडासह आईचा मृतदेह विहीरीत आढळला ; संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावातील घटना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तीन भावंडासह आईचा मृतदेह विहीरीत आढळला ; संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा गावातील घटना

संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगांवजवळील खांडगेदरा गावात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका विहीरीत तीन भावंडासह आईचा मृतदेह

वाचन संस्कृती टिकवण्यासाठी घरात वाचनालय गरजेचे ः स्नेहलता कोल्हे
राजगड पोलीस ठाण्यातील पोलीसाची गळफास लावून आत्महत्या l Lok News24
Sangamner : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार l LokNews24

संगमनेर/प्रतिनिधी : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगांवजवळील खांडगेदरा गावात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास एका विहीरीत तीन भावंडासह आईचा मृतदेह आढळला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घारगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. मृतात २८ वर्षीय आईसह पाच व साडेतीन वर्षाच्या दोन मुली व चार महिन्याच्या मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्युची नोंद केली असुन मृतदेह वैद्यकीय अहवालासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट दिली आहे.खांडगेदरा गावात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. स्वाती बाळासाहेब ढोकरे (वय २८ वर्षे), भाग्यश्री बाळासाहेब ढोकरे (वय ५ वर्षे), माधुरी बाळासाहेब ढोकरे (वय साडेतीन वर्षे) व शिवम बाळासाहेब ढोकरे (वय चार महिने) यांचा समावेश आहे. या सर्वांचे मृतदेह त्यांच्या घराशेजारील विहीरीत आढळून आले आहेत. या महिलेचे आईवडीलदेखील त्याच गावात राहण्यास आहेत. महिलेचा पती व सासु शुक्रवारी बाहेरगावी गेले होते. तर घरी आजोबांजवळ ही मुले होती. मुलांचे आजोबा व महिलेचे सासरे शेतात काम करत असतांना या महिलेने मुलांना सोबत घेत विहीरीत आत्महत्या केल्याचा पोलिसांचा कयास आहे. महिलेसह तिच्या तिन्ही मुलांचे मृतदेह विहीरीतुन वर काढण्यात आले असुन पुढील तपासणीसाठी ते संगमनेरला पाठविले आहेत.दरम्यान या संदर्भात घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबधीत महिला मंदबुध्दीची असून तीने मुलांसह विहीरीत आत्महत्या केली असावी. या संदर्भात तिच्या कोणत्याही नातेवाईकाने तक्रार केली नसल्याचे त्यांनी सौ शहरी एक संगमनेरी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. तसेच या संदर्भात पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पठार भागात महिलेसह तीन भावंडाचे मृतदेह विहीरीत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

COMMENTS