पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे बुर्‍हाणनगर येथून अपहरण

Homeताज्या बातम्या

पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे बुर्‍हाणनगर येथून अपहरण

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहराजवळील बुर्‍हाणनगर गावातील राहत्या घरापासून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना मंगळवारी (द

नगरच्या मध्यवस्तीतील दोन घरे चोरट्यांनी फोडली
माजी मंत्री व ज्येष्ठ सहकार नेते शंकरराव कोल्हे यांचे निधन
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात रक्तदान शिबिरांचे आयोजन : अजित जगताप

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहराजवळील बुर्‍हाणनगर गावातील राहत्या घरापासून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना मंगळवारी (दि. 1 मार्च) पहाटे 1.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुर्‍हाणनगर गावातील त्यांच्या राहत्या घराजवळून एका अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलीला कशाचे तरी आमीष दाखवून पळवून नेले असल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे बुर्‍हाणनगर परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस संबंधित मुलीचा व अपहरणकर्त्याचा शोध घेत आहेत.

COMMENTS