युक्रेनची नाटो राष्ट्रांकडूनच फसवणूक !

Homeताज्या बातम्यासंपादकीय

युक्रेनची नाटो राष्ट्रांकडूनच फसवणूक !

    रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये नाटो देशांनी स्क्रीन ला फसवलं, याची भावना उर्वरित जगातील जनतेची झालेली आहे. शीत युद्ध संपल्यानंतर अनेक तुकड्यांमध्य

आशुतोष पठ्ठ्या कामाला माझ्यासारखाच
राजस्थानमध्ये ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली 
Lonand : मुजोर पोलीसांचा पत्रकारांनी केला निषेध (Video)

    रशिया आणि युक्रेन युद्धामध्ये नाटो देशांनी स्क्रीन ला फसवलं, याची भावना उर्वरित जगातील जनतेची झालेली आहे. शीत युद्ध संपल्यानंतर अनेक तुकड्यांमध्ये विभाजित होऊनही रशिया जगाच्या दृष्टीने आण्विकसंपन्न असल्यामुळे महासत्तेशी टक्कर देण्याची त्याची शक्ती अजून शाबूत आहे, हे दाखवून देत आहे. वास्तविक रशिया आणि युक्रेन युद्ध ही अमेरिकन भांडवलदारांच्या माध्यमातून महासत्तेने उचललेले एक भीषण पाऊल आहे. युरोपीय देशही नेहमीच अमेरिकेची तळी उचलत असल्यामुळे ते देखील या युद्धामध्ये रशिया विरोधात दिसतात. याचा अर्थ ते युक्रेन ला पूर्णपणे साथ देत आहेत, असा होत नाही. युद्ध हे नेहमीच जमिनीवर लढले जाते. त्यामुळे युद्धाचा पहिला टप्पा हा जमिनीवरच्या सैन्याच्या माध्यमातूनच लढवला जातो. रशियाने ज्या पद्धतीने युक्रेनमध्ये आपले सैन्य घुसवलेले आहे ते पाहता दुसऱ्या महायुद्धात स्टॅलीनने वापरलेली रणनीतीच युक्रेनमध्ये वापरली जात असल्याचे दिसत आहे. नाझी सैन्याला पराभूत करण्यासाठी स्टॅलिनच्या रणनीतीने सर्वप्रथम नाझी च्या सैन्याला लेनिनग्राड पर्यंत आतमध्ये कूच करू दिले. त्यानंतर हिटलरच्या सैन्याला चहुबाजूने घेरत रशियामध्येच त्यांचा पाडाव केला आणि दुसऱ्या महायुद्धाची इतिश्री झाली. दुसऱ्या महायुद्धात नाझी किंवा हिटलरच्या सैन्याचा ज्या पद्धतीने पराभव स्टॅलीनने केला तीच रणनीती युक्रेनमध्ये वापरली जात आहे. परंतु इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही, हेच खरे. रशिया अण्वस्त्रसंपन्न  देश असल्यामुळे रशियाशी युद्ध घेणे जगातल्या कोणत्याही देशाला परवडणारे नाही. सध्या रशियाचे सर्वेसर्वा असलेले ब्लादिमीर पुतीन यांनी तर अण्वस्त्रसंपन्न सैन्याला अलर्ट राहण्याचेही आदेश दिल्यामुळे, जगाचा थरकाप उडाला आहे. या संदर्भामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेचीही तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघटनेत झालेल्या मतदानामध्ये एकोणतीस विरुद्ध पाच असा जरी चर्चेचा ठराव मंजूर झाला असला तरी १३ देशांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली; याचा अर्थ असा होतो की हे तेरा देश धड नाटो देशांच्या सोबतही नाहीत आणि धड रशिया सोबतही नाही. अशाप्रकारचा तटस्थपणा आजच्या काळात न परवडणारा आहे. यापूर्वी जग तीन विभागात विभागलेले होते. त्यातील पहिला टप्पा हा निश्चितपणे विकसित देशांचा होता, तर दुसरा टप्पा हा डाव्या विचारसरणीचा परंतु, विकसनशील देशांचा होता; आणि तिसरा भाग हा अविकसित देशांचा होता. मात्र आजची अवस्था जर पाहिली तर जग हे दोनच विभागात विभागलेले आहे. त्यातला पहिला टप्पा हा विकसित आणि भांडवल संपन्न देशांचा आहे; तर दुसरा टप्पा हा भांडवलदारी प्रभुत्व ज्या देशांवर निर्माण केले जात आहे, अशा अविकसित देशांच्या टप्पा आहे. युक्रेन या प्रकरणावर रशियाने आपली ठोसपणे ठेवलेली भूमिका आणि यूक्रेन उध्वस्त झाला तरी अमेरिकेची दामटलेली भूमिका या दोन भूमिका म्हणजे शीतयुद्धाचा हा नवा प्रकार आहे. वस्तुस्थिती मध्ये यूक्रेन बेचिराख होतो आहे! युक्रेनच्या सत्ताधारी कितीही दावे करत असले तरीही रशियन सैन्याने ज्या पद्धतीने आक्रमण केले आहे, ते पाहता युक्रेनच्या नागरी समाजावर देखील याचे प्रचंड परिणाम झालेले आहेत. अमेरिका आणि युरोपीय देश हे केवळ त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी म्हणजे रशियाच्या सीमेवर स्वत:चे सैन्य तैनात करण्यासाठी ते युक्रेनचा वापर करीत आहेत, हे त्यांच्या (युक्रेन)च्या लक्षातही आले नाही आणि युक्रेन त्यांच्या जाळ्यात आयतेच सापडले. रशिया – युक्रेन हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची कदाचित नांदी ठरू शकते. परंतु अण्वस्त्रसंपन्न जगाला यावर ठोस असा निर्णय घ्यावा लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये जगामध्ये अशा प्रकारची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी सावध राहावे लागेल. दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये जी मानवी मूल्य निर्माण झाली त्या मानवी मूल्यांच्या पेक्षाही अधिक मानवतावादी मूल्य या घटनेनंतर जागतिक संघटना आणि सर्व महासत्तांना जोपासावे लागतील

COMMENTS