मनपासमोर कामगार संघटनेचे धरणे आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपासमोर कामगार संघटनेचे धरणे आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी : मनपा कामगार युनियनने कामगारांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून (28 फेब्रुवारी) मनपासमोर धरणे आंदोलन सुरू

‘त्या’ तरुणीने विषारी औषध घेवून केला आत्महत्येचा प्रयत्न
आणखी 30 पिशव्यांतून निघाले बेन्टेक्सचे दागिने ; नगर अर्बन बँकेचे बनावट सोनेतारण गाजणार
पंडीत भारुड यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार जाहीर

अहमदनगर/प्रतिनिधी : मनपा कामगार युनियनने कामगारांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून (28 फेब्रुवारी) मनपासमोर धरणे आंदोलन सुरू केले. युनियन अध्यक्ष अनंत लोखंडे व सरचिटणीस आनंदराव वायकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
मनपा कामगारांना सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठीच्या प्रस्तावास शासन मान्यता मिळण्यासाठी कार्यवाही करावी, 305 व 506 कर्मचार्‍यांतील सफाई कामगारांच्या वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने मनपा सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावास शासनाची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, करोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 50 लाखाची नुकसान भरपाई मिळावी, सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य गृहनिर्माण योजनेंतर्गत तसेच सफाई कर्मचारी व इतर सर्व कर्मचार्‍यांकरीता पंतप्रधान आवास योजनेतंर्गत नव्याने घरकूल योजना राबविण्यात यावी, पात्र कर्मचार्‍यांना बढती व पदोन्नतीचा लाभ मिळण्यासाठी प्रशासनास सादर केलेले गोपनीय अहवाल ग्राह्य धरून लाभ मिळण्यासाठी निवड समितीचे आयोजन करावे, एलएसजीडी व एलजीएस परीक्षा उत्तीर्ण केलेल्या कर्मचार्‍यांना वेतनवाढ द्यावी, आरसीएच योजनेतील कर्मचार्‍यांना मनपा सेवेत सामावून घेण्यासाठी शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, सहाव्या वेतन आयोगाच्या थकीत फरकाची रक्कम मिळावी, 506 कर्मचारी व हद्दवाढीतील कर्मचार्‍यांना पाचव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा, वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती योजनेतर्गत कर्मचार्‍यांनी सादर केलेले सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने मान्य करावेत आणि कालबध्द पदोन्नती लागू करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांना फरक तातडीने अदा करण्यात यावा, आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत.

COMMENTS