सिव्हील हॉस्पिटल आगप्रकरणी अखेर डॉ. पोखरणाला अटक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिव्हील हॉस्पिटल आगप्रकरणी अखेर डॉ. पोखरणाला अटक

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागाला चार महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीप्रकरणी तोफखाना पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात

अण्णांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन क्रांतीविरानां केले अभिवादन
बिलाच्या कारणावरून डॉक्टरांनी केली रुग्णाच्या नातेवाईकास मारहाण
वंचितांना ऊबदार ब्लँकेट, कपडे व फराळचे वाटप

अहमदनगर/प्रतिनिधी : नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागाला चार महिन्यांपूर्वी लागलेल्या आगीप्रकरणी तोफखाना पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात सिव्हीलचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा याला सोमवारी पोलिसांनी अटक केली व लगेच त्याची जामीनावर सुटका केली.
नगरच्या जिल्हा रुग्णालयात 6 नोव्हेंबर 2021 रोजी लागलेल्या आगीच्या घटनेप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना आरोपी करण्यात आले आहे. त्यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतलेला असल्याने त्यांना अटक करुन न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांची तत्काळ मुक्तता करण्यात आल्याचे तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी सांगितले. नोव्हेंबर महिन्यात दिवाळी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी 11च्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता विभागास लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनीच स्वतः फिर्यादी होऊन कलम 304 अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात एका महिला डॉक्टरसह तीन परिचारिकांना यापूर्वी अटक झाली होती. त्यांची जामिनावर मुक्तता झाली आहे. मात्र, या प्रकरणात डॉ. पोखरणा यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला होता. या आगीच्या घटनेबाबत दाखल गुन्ह्याचा पोलिस तपासही सुरूच होता. पोलिस उपअधीक्षक कातकाडे यांच्यामार्फत या घटनेचा तपास होत आहे. शासनाने या घटनेप्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीही नियुक्त केली होती. त्यांनीही शासनाकडे अहवाल सादर केला होता. हा अहवाल आता पोलिसांकडेही सादर झाला आहे. चौकशी समितीचा अहवाल, त्यातील जाबजबाब व पोलिसांच्या तपासात डॉ. पोखरणा दोषी आढळल्यामुळे त्यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले असल्याचे उपअधीक्षक कातकाडे यांनी सांगितले. दरम्यान, पोखरणा यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविलेला आहे. त्यांना अटक केल्यास त्यांना तत्काळ जामिनावर मुक्त करावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते. त्यानुसार त्यांना सोमवारी दुपारी अटक करुन जामिनावर मुक्त करण्यात आले आहे. दुपारी त्यांची चौकशीही करण्यात आली असून, त्यांच्याकडे उर्वरीत तपास व चौकशी केली जाणार असल्याचेही उपअधीक्षक कातकाडे यांनी सांगितले.

COMMENTS