श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील शोपिया जिल्ह्यात सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी शुक्रवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले. अमशीपोरा गावात सकाळी सुरक्षा द
श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील शोपिया जिल्ह्यात सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी शुक्रवारी दोन दहशतवाद्यांना ठार केले. अमशीपोरा गावात सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात लष्कर-ए-तय्यबाच्या 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. अमशीपोरा गावात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर लष्कर, पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त दलाने या परिसरात शोध मोहिम सुरु केली. गावाला घेराव घातल्यानंतर सुरक्षा दलाचे जवान घरांची झडती घेत असताना गोळीबार सुरु झाला. याला प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. जवळपास दोन तास चकमक सुरु होती. या दोन्ही दहशतवाद्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर दारुगोळा आणि आक्षेपार्ह साहित्य आढळून आले. चकमकीत ठार झालेले दोघेही स्थानिक असल्याची माहिती आहे. अद्याप चकमकीबद्दल अधिकृतरित्या त्यांची नावे किंवा इतर माहिती सांगण्यात आलेली नाही. दोघांना ठार केल्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहिम सुरु ठेवली होती. मात्र परिसरात आता कोणी दहशतवादी लपला नसल्याची खात्री झाल्यानंतर शोध मोहिम थांबवण्यात आली.
COMMENTS