Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणीदार वरूडची महती देशभरात पसरेल : इंद्रजीत देशमुख

शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सुरवातवरुड गावच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी आपल्या गावास पाणीदार बनविण्यासाठी 2 लिटर प्रत्येकी डिझेल देण्याचे

एफआरपीची रक्कम मिळणार आता दोन टप्प्यात
राज्यातील साखर कारखान्यांनी ऊसाचे दर अधिकृतपणे जाहीर करावेत : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील
किल्ल प्रतापगड संवर्धनात शासन कमी पडणार नाही : ना. एकनाथ शिंदे

शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सुरवात
वरुड गावच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी आपल्या गावास पाणीदार बनविण्यासाठी 2 लिटर प्रत्येकी डिझेल देण्याचे जाहीर केले. यामध्ये 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून आणखी नावे वाढणार असल्याने ग्रामस्थांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

नाम फाउंडेशनकडून वरूडसाठी मशीन उपलब्ध
औंध / वार्ताहर : दुष्काळी परिस्थितीत लढणारी गावे पाणीदार होण्यासाठी नाम फाउंडेशन, शिवार सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी तुमच्या गावास केवळ इंधनाच्या खर्चावर मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. वरुड ग्रामस्थांनी संधीचे सोने करावे यामुळे पाणीदार वरूडची महती देशभरात पसरेल, असा विश्‍वास माजी सनदी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.
वरुड, ता. खटाव येथे जलसंधारणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसिलदार किरण जमदाडे, गणेश थोरात, बाळासाहेब शिंदे, आबा लाड, जितेंद्र शिंदे, निलम देशमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, पोलीस पाटील, देवस्थान ट्रस्ट, शालिनीताई पाटील हायस्कूलचे विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
तहसिलदार किरण जमदाडे म्हणाले, वरूड गावाचे वृक्षांविषयीचे प्रेम व जलसंधारणाचे सुरू असलेले काम इतरांना प्रेरणादायी आहे. प्रशासन सदैव आपल्या गावाला उत्तम प्रकारे सहकार्य करेल. त्याचबरोबर आपल्या खास कवितेच्या शैलीतून गावाचा विकास कसा असतो याचे उदाहरण यावेळी त्यांनी दिले.
गणेश थोरात म्हणाले, वरूड गावाने नाम फाउंडेशनच्या मशीनचा जास्तीत-जास्त फायदा करून घ्यावा. जो पर्यंत गाव डिझेलची व्यवस्था करेल तोपर्यंत गावातून मशीन कोठेही जाणार नाही, असा विश्‍वास ग्रामस्थांना दिला. जितेंद्र शिंदे व बाळासाहेब शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

COMMENTS