नगरला सेक्स रॅकेटचे ग्रहण?… त्या महिलेचा पर्दाफाश करा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरला सेक्स रॅकेटचे ग्रहण?… त्या महिलेचा पर्दाफाश करा

अहमदनगर/प्रतिनिधी : शहरात व जिल्ह्यात बेंगलोर, कलकत्ता, पुणे-मुंबई या भागातून मुली आणून त्यांच्याद्वारे देहविक्रीचा व्यवसाय चालवणार्‍या केडगाव येथील

त्या’ 6 खासगी सावकारांची पोलिस करणार चौकशी ?
बेलापूरातील सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीला वचक
खर्डा दसरा महोत्सवाला आंतरराष्ट्रीय कलाकारांची हजेरी

अहमदनगर/प्रतिनिधी : शहरात व जिल्ह्यात बेंगलोर, कलकत्ता, पुणे-मुंबई या भागातून मुली आणून त्यांच्याद्वारे देहविक्रीचा व्यवसाय चालवणार्‍या केडगाव येथील त्या महिलेचा पर्दाफाश होण्यासाठी तिच्या मोबाईलची सीडीआर तपासणी करण्याची मागणी येथील फिरोज पठाण याने पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या महिलेने 29 हजार रुपयाच्या उधारीपोटी तब्बल 2 लाख रुपये उकळले असून, ही महिला त्रास देत असल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. तिच्यावर कारवाई झाली नाही तर पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर सहकुटुंब उपोषण करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.

पठाण यांची केडगाव येथील त्या महिलेशी ओळख एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयात झाली होती. त्या महिलेशी मैत्री झाल्यानंतर तिचा खरा व्यवसाय समजला. ही महिला शहरात व जिल्ह्यात मुली पुरवण्याचे काम करीत आहे. नगरच्या बसस्थानक येथील एका हॉटेलमध्ये व मांडवगण फाटा येथील एका ढाब्यावर तिने देहविक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे या महिलेची चौकशी केल्यास मोठे सेक्स रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. शहर व जिल्ह्यात फोनद्वारे ही महिला अनेकांना मुली पुरवण्याचे काम करते, असे नमूद करून निवेदनात म्हटले आहे की, या महिलेकडून पत्नी आजारी असताना 29 हजार रुपये उसने घेतले होते. ते पैसे परत करता आले नाही. माझ्याकडे एका सामाजिक संस्थेत मुख्यमंत्री सहायता निधीतून वेश्याव्यवसाय करणार्‍या महिलांना आलेल्या अनुदान वाटपासाठी यादी बनविण्याचे काम होते. या महिलेने दिलेली 126 नावे त्या यादीत टाक, नाहीतर माझे पैसे परत दे, अशी धमकी दिल्याने पठाण घाबरले. तिने पठाण यांना ती यादी दिली. सर्व नावे एकसारखी असल्याने ही खोटे नावे टाकण्यास त्यांनी नकार दिला होता. या महिलेने त्या सामाजिक संस्थेलादेखील ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी ती देते आहे. त्या महिलेने दिलेले उसने पैसे परत करण्यासाठी दागिने, गाडी विकून व उधारी करुन 29 हजारापोटी 2 लाख रुपये दिले. परंतु अद्याप ही महिला त्रास देत आहे, असे पठाण यांचे म्हणणे आहे. पोलिसांनी मदत केल्यास या महिलेचे सर्व अवैध धंदे दाखवून देण्याची तयारी पठाण यांनी दर्शवली आहे.

COMMENTS