नगर मर्चंटस्  बँकेला 8 कोटीचा नफा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर मर्चंटस् बँकेला 8 कोटीचा नफा

येथील अहमदनगर मर्चंटस् को-ऑप बँकेची ऑनलाईन वार्षिक सभा नुकतीच झाली.

कौन बनेगा नया नगरसेवक… मनपा पोटनिवडणुकीसाठी 45 टक्के मतदान; आज मतमोजणी
बेलापूर महाविद्यालयात चित्रपट निर्मिती कार्यशाळा उत्साहात
स्वाभिमानासाठी येणारी निवडणूक जिंकावी लागेल

अहमदनगर/प्रतिनिधी- येथील अहमदनगर मर्चंटस् को-ऑप बँकेची ऑनलाईन वार्षिक सभा नुकतीच झाली. सर्व ठराव एकमताने मंजूर झाले. बँकेस यंदा 8 कोटी 1 लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेचे अध्यक्ष आनंदराम मुनोत यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. संपूर्ण जगाला कोरोना महामारीचा आर्थिक फटका बसलेला असून, त्याचा मोठा परिणाम बँकींग व्यवसायावर देखील झालेला आहे, असे असतांना सुद्धा  अहमदनगर मर्चंटस् बँकेच्या चालू वर्षात ठेवी 135 कोटी 61 लाखांनी वाढलेल्या असून, बँकेच्या कर्जात 71 कोटी 95 लाखांनी वाढ झाली आहे, अशी माहिती मुनोत यांनी दिली. 

कोरोनामुळे बँकेतील कर्ज खातेदार, सभासद यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने या बाबींचा विचार करुन 1मे 2020 पासून कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत व रिबेटचे दरदेखील वाढविले आहे. या वर्षी बँकेला 21 कोटी 70 लाखांचा ढोबळ नफा झाला असून, त्यातील आयकर व इतर तरतुदी वजाजाता बँकेस निव्वळ नफा 8 कोटी 1 लाखांचा झाला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्याचे प्रमाण 10.77 टक्के असून, 17.35 टक्के रिबेट दिला आहे. भागभांडवल 20 कोटी 3 लाखांचे असून, राखीव व इतर निधी 145 कोटी 48 लाखांचा आहे, अशी माहिती त्यांनी दिली. उपाध्यक्ष सुभाष बायड, बँकेचे ज्येष्ठ संचालक हस्तीमल मुनोत, किशोर गांधी, सीए अजय मुथा, अनिल पोखरणा, आदेश चंगेडिया, संजय बोरा, सीए मोहन बरमेचा, कमलेश भंडारी,  संजय चोपडा, अमित मुथा, संजीव गांधी, विजय कोथिंबीरे, मीनाताई मुनोत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी उपस्थित होते.    

कॅशलेस व्यवहारांचे आवाहन

कॅशलेस व्यवहार करण्यासाठी बँकेचे खातेदार, सभासद व व्यापारी यांनी प्राधान्य द्यावे. त्यामुळे त्यांच्या बहुमुल्य वेळेची बचत होते व कोरोनाच्या प्रादुर्भावासही आळा लागेल, असा विश्‍वास अध्यक्ष मुनोत यांनी यावेळी व्यक्त केला. बँकेच्या कामकाजात सुसुत्रता येण्यासाठी व कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आयएसओ 9001 चे मानांकन प्राप्त करण्यासाठी बँकेच्या तारकपूर शाखेची निवड करण्यात आली असून, त्याचे कामही प्रगतीपथावर असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष बायड यांनी आभार मानले. सभा ऑनलाईन असल्यामुळे सभासदांच्या व सर्वांच्या सोयीसाठी डिजिटल बोर्ड लावण्यात आला होता. कोविड-19 चे सर्व नियम पाळून, सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टसिंगचे पालन करुन सभा उत्साहात झाली.

फोटो ओळी

अहमदनगर मर्चंटस् को-ऑप बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना अध्यक्ष आनंदराम मुनोत.  व्यासपीठावर उपाध्यक्ष सुभाष बायड, बँकेचे ज्येष्ठ संचालक हस्तीमल मुनोत, किशोर गांधी, सीए अजय मुथा, अनिल पोखरणा, आदेश चंगेडिया, संजय बोरा, सीए मोहन बरमेचा, कमलेश भंडारी, संजय चोपडा, अमित मुथा, संजीव गांधी, विजय कोथिंबीरे, मीनाताई मुनोत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी आदी

ईींंरलहाशपीीं रीशर

COMMENTS