नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बजेट (Budget 2022) सादर करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशातील दुर
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी बजेट (Budget 2022) सादर करताना एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. देशातील दुर्बलांना परवडणारी घरं देण्यासाठी या वर्षीच्या बजेटमध्ये 48 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2023 पर्यंत देशामध्ये 80 लाख नवीन घरं बांधणार असल्याचंही निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केलं आहे.
80 लाख घरे बांधण्यापासून ते लघु उद्योगाला 2 लाख कोटी रुपये देण्यापर्यंतच्या 25 मोठ्या घोषणा सीतारामन यांनी केल्या आहेत. तसेच आरबीआय (RBI) डिजीटल करन्सी लाँच करणार असल्याची घोषणाही सीतारामन यांनी केली आहे. चौथ्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या निर्मला सीतारामण यांनी देशाचा आर्थिक विकास दर हा 9.2 टक्के राहणार असल्याचं सांगून देशवासियांना मोठा दिलासा दिला आहे. तसेच विकास हाच बजेटचा केंद्र बिंदू असून महिला, तरुण आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
एमएसपीला 2.7 लाख कोटींची तरतूद
किमान आधारभूत मूल्यासाठी 2.7 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. ग्रामीण विक्रीला प्रोत्साहन मिळणार आहे.
डिजीटल विद्यापीठ बनवणार
सर्व राज्यांना पर्यायी शिक्षण देण्यात केंद्र मदत करणार आहे. सर्व भाषांमध्ये शिक्षणासाठीची सोय उपलब्ध असणार आहे. ऑनलाईन शिक्षणावर भर देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं आहे. एक डिजीटल विद्यापीठही बनवलं जाणार आहे, अशी माहिती निर्मला सीतारामण यांनी दिली.
COMMENTS