कर रचना जैसे थे ; नोकरदारांना दिलासा नाहीच

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर रचना जैसे थे ; नोकरदारांना दिलासा नाहीच

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, मंगळवारी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.यावर्षीच्या अर्थसंकल्प

बुलडाणा जिल्हा कॅन्सरमुक्त करण्याचा प्रयत्न करणार : डॉ.राजेंद्र शिंगणे
संयुक्त महाराष्ट्र निर्मिती साठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन
शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू.

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, मंगळवारी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात कर रचना तशीच ठेवण्यात आलीय. यात कुठलाही बदल झालेला नाही. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदीसदृष्य परिस्थिती होती. त्या परिस्थितीमध्ये आता काहीशी सुधारणा होत असून अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर येताना दिसत आहे. पण गेल्या दोन वर्षांचा विचार करता केंद्र सरकारने या वर्षीच्या कर रचनेत बदल व्हावी आणि ती कमी करण्यात यावी अशी मागणी होत होती. पण या वर्षी त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. अडीच लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल. तर अडीच ते पाच लाख रुपये उत्पन्नावर 5 टक्के कर आकारणी केली जाईल. 5 ते 7.5 लाखांवर 10 टक्के, 7.5 ते 10 लाख उत्पन्नावर 15 टक्के 10 ते 12.5 लाखांवर 20 टक्के 12.5 ते 15 लाख वार्षीक उत्पन्नवर 25 टक्के आणि 15 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर भरावा लागणार आहे.

COMMENTS