अहमदनगर/प्रतिनिधी : फिनायल तोंडात ओतून विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल पतीसह सासू-सासर्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर-पुणे रोडवरील जय
अहमदनगर/प्रतिनिधी : फिनायल तोंडात ओतून विवाहितेच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल पतीसह सासू-सासर्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर-पुणे रोडवरील जयभीम हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणार्या स्नेहा दिनेश मेढे (वय 25) या विवाहितेला सासू-सासरे आणि नवरा यांनी मारहाण करीत तिला पकडून ठेवत तिच्या तोंडामध्ये फिनायल ओतून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. त्यामुळे ही विवाहिता अत्यवस्थ झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असतानाच पीडित महिलेने कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले की सासरच्यांकडून वारंवार शिवीगाळ व मारहाण होत असे. कपडे धुण्याच्या कारणावरून पतीने मारहाण करीत तिला जमिनीवर पाडले. त्या वेळी सासू-सासर्यांनी तिचे पाय पकडून ठेवले. पतीने माझ्या तोंडामध्ये फिनायल टाकून मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार उपचार सुरू असलेल्या विवाहितेने कोतवाली पोलिसांना दिलेल्या जबाबात केली आहे. त्या आधारे कोतवाली पोलिसांनी विवाहितेचा पती दिनेश गौतम मेढे तसेच अनिता गौतम मेढे (सासू) व गौतम मेढे (सासरा, सर्व राहणार जय भीम हौसिंग सोसायटी, स्टेशन रोड अहमदनगर) या तिघांवर भारतीय दंड विधान कलम 307, 328, 498, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विवेक पवार करीत आहेत. महिलेच्या खुनाच्या प्रयत्नाच्या या गुन्ह्याने जयभीम हौसिंग सोसायटीच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
COMMENTS