सासूरवाडीतील मुक्कामावरून दाम्पत्यात वाद… पत्नीचा मृत्यु

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सासूरवाडीतील मुक्कामावरून दाम्पत्यात वाद… पत्नीचा मृत्यु

अहमदनगर/प्रतिनिधी : सासूरवाडीत मुक्कामी राहण्याच्या वादातून पतीने पत्नीस बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला, परंतु हा मृत्यू अपघाती झाल्य

Ahmednagar : सनफार्माला लागलेल्या आगीत कर्मचाऱ्याचा मृत्यू, प्लांटचे नुकसान |
ठिबक सिंचनासाठी कर्जत तालुक्याला राज्यात सर्वाधिक आर्थिक लक्षांक- आ.रोहित पवार
कत्तलीसाठी नेणार्‍या सहा जनावरांची पोलिसांनी केली सुटका

अहमदनगर/प्रतिनिधी : सासूरवाडीत मुक्कामी राहण्याच्या वादातून पतीने पत्नीस बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला, परंतु हा मृत्यू अपघाती झाल्याचा बनाव केल्याची घटना अकोले तालुक्यातील मुरशेत येथे घडली. याबाबतची माहिती अशी की संजय बांगर यांची पत्नी शोभा हिची माहेरी मुक्कामी थांबण्याची इच्छा होती. पण पती संजय सासूरवाडीत मुक्कामी थांबण्यास इच्छुक नव्हता. त्यावरून त्या दोघात जोरदार भांडण झाले. रागातच दोघे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास स्वतःच्या घरी जाण्यास निघाले. रस्त्यात पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. त्यावेळी त्याने केलेल्या मारहाणीत शोभाचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह जागेवरच सोडून तो घरी गेला. नंतर एकाची गाडी घेऊन तो मृतदेह परत घरी आणला व दुसर्‍या दिवशी ती गाडीवरुन पडल्याने मृत झाल्याची माहिती सासूरवाडीला कळविली. मात्र, शोभाच्या शवविच्छेदनात तिच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्याने हा प्रकार घातपाताचा असल्याचे स्पष्ट झाले.
अकोले तालुक्यातील मुरशेत येथे पती-पत्नीच्या भांडणात पत्नीला जीव गमवावा लागल्याची ही दुर्दैवी घटना घडली आहे. राजूर पोलिसांनी संजय बांगर यास अटक केली आहे. मृत शोभाचा भाऊ त्रिंबक रामदास गोंदके याने राजूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने मुरशेत परिसरात खळबळ उडाली आहे. सासूरवाडीत राहण्यावरून दाम्पत्यात वाद होऊन पत्नीला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS