मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. ”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. शरद पवार यांनी स्वतः ट्विट करत ही माहिती दिली आहे. ”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण चिंता करण्याचे कारण नाही. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करुन घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.” असे शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे.याआधी राज्यातील सुमारे १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली होती. अधिवेशन कालावधीत अवघ्या पाच दिवसांत २० आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते.
COMMENTS