जानेवारी, फेब्रुवारीत विस्फोटक स्थिती : वडेट्टीवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जानेवारी, फेब्रुवारीत विस्फोटक स्थिती : वडेट्टीवार

लग्न समारंभासह धार्मिक कार्यक्रमांना आता 50 लोकांनाच परवानगी

मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असून, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार असल्याचे मदत

राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसवण्याची वंचितची मागणी
हॉटेल मालकाची तलवारीने सपासप वार करून हत्या: परिसरात प्रचंड तणाव। LokNews24
मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अविनाश कदम यांची निवड

मुंबई : राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून आपण लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असून, जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये विस्फोटक स्थिती निर्माण होणार असल्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र लॅाकडाऊनच्या उंबरठ्यावर असून, राज्यात रुग्ण वाढले आहेत. लॅाकडाऊन लागलं तर शाळा, मुंबई लोकल अशा अनेक सेवांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात दोन दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. शिवाय ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, या विषाणूच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यूही झाला. या पार्श्‍वभूमीवर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नसल्याचे सरकारच्या उच्चपदस्थांचे मत आहे. त्यामुळे राज्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये या साठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणार्‍यांची मर्यादा 50 केली असून अंतिम संस्कारासाठी केवळ 20 लोकांना मुभा देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या वतीने जारी परिपत्रकात सदर माहिती देण्यात आली असून बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणार्‍या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा 100 वरून 50 करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे दालनात किंवा खुल्या जागेत होणार्‍या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही सदर मर्यादा 50 करण्यात आली आहे.
हे निर्बंध 31 डिसेंबर 2021 च्या रात्री 12:00 वाजेपासून अंमलात येणार आहे. परिपत्रकात पुढे असे ही नमूद करण्यात आले आहे की, अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा आता अधिकतम 20 असेल. त्याच प्रमाणे राज्यातील पर्यटक स्थळांवर, समुद्रकिनारपट्टी, क्रीडांगणे या सारख्या जास्त लोकांना आकृष्ट करणार्‍या ठिकाणी सक्षम प्राधिकरणास, 24 डिसेंबरच्या आदेशानुसार लागू केलेले सर्व निर्बंधांव्यतिरिक्त आवश्यक वाटल्यास (जमावबंदी) 144 सी आर पी सी लागू करता येईल. या शिवाय आदींच्या आदेशाप्रमाणे लागू सर्व निर्बंध पुढील आदेशापर्यंत अंमलात राहतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला. सध्या तरी गर्दी कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. अलीकडे राज्यात विवाहसोहळे मोठया दिमाखात आणि गर्दीत साजरे होत आहेत. त्यातूनच संसर्गाचा अधिक प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे विवाह सोहळयांतील गर्दी रोखण्यावर भर देण्यात आला आहे. खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातील विवाह सोहळयांमध्ये फक्त 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल. सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त 50 लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल. ही संख्या खुल्या किंवा बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांना लागू असेल.

COMMENTS