Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंगळवेढा तालुक्यात विषबाधा; दोन लहान मुलींचा मृत्यू

सोलापूर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे विष बाधा होऊन दोन लहान मुलींचा मृत्यु झाला. बाहेरच्या दुकानातील खाऊ खाल्ल्यानंतर एकाच कुटुं

महावितरणच्या उत्कृष्ठ उपविभाग पुरस्काराने मेढा उपविभागाचा सन्मान
मांढरदेव यात्रेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवावा : प्रमुख जिल्हा न्यायाधीश न्या. व्ही. आर. जोशी
भारतीय संविधान सक्षम : प्राचार्य बाळ कांबळे

सोलापूर / प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे विष बाधा होऊन दोन लहान मुलींचा मृत्यु झाला. बाहेरच्या दुकानातील खाऊ खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा झाली. यामध्ये दुर्दैवाने दोन चिमुकल्या मुलींचा यात दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी आणि खळबळजनक घटना मंगळवेढा तालुक्यातील मरवडे या गावात घडली आहे. भक्ती आबासाहेब चव्हाण (वय 6) व नम्रता आबासाहेब चव्हाण (वय 4) या दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अन्न आणि औषध भेसळ प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे अशा घटना सर्वत्र घडत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत मुलींच्या वडिलांनी आपल्या मुलींसाठी मंगळवेढा येथील एका दुकानांतून खाऊ आणला होता. तो खाऊ घरातील चौघांनी खाल्ला. त्यानंतर चव्हाण कुटुंबातील सर्वांनाचा त्रास होऊ लागल्यामुळे, पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यात उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे मोठी मुलगी भक्ती हिचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री लहान मुलगी नम्रता हिचा मृत्यू झाला. मयत मुलींचे वडील आबासाहेब चव्हाण आणि त्यांची पत्नी सुषमा यांच्यावर सद्या उपचार सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यात भेसळ माल आणि डुप्लिकेट खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते आहे. याकडे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा प्रशासन आणि अन्न व औषध भेसळ खाते दुर्लक्ष केल्यामुळे अशा जीवघेणी घटना घडत आहेत.

COMMENTS