आईचा गर्भ आणि कबर दोनच ठिकाण सुरक्षित

Homeताज्या बातम्यादेश

आईचा गर्भ आणि कबर दोनच ठिकाण सुरक्षित

हृदयद्रावक चिठ्ठी लिहून अल्पवयीन बलात्कार पीडितेची आत्महत्या

चेन्नई/वृत्तसंस्था : देशात बलात्काराच्या घटनेत वाढ झाली असून, त्या तुलनेत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. असे असतांनाच चेन्नईमध्ये अल्पयीन

सावित्रीमाई स्मृतिदिनी आयटक, एआयएसएफ तर्फे अभिवादन
राष्ट्रपती पदासाठी मुर्मू यांचा विजय निश्चित !
समाज नेहमीच चांगल्या कार्याची दखल घेत असतो ः अ‍ॅड. मडके

चेन्नई/वृत्तसंस्था : देशात बलात्काराच्या घटनेत वाढ झाली असून, त्या तुलनेत आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण नगण्य आहे. असे असतांनाच चेन्नईमध्ये अल्पयीन बलात्कार पीडितेने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, यात ती म्हणते की, आईचा गर्भ आणि कबर दोनच सुरक्षित ठिकाण असल्याची भावना तिने व्यक्त केल्या आहेत. तिच्या या चिठ्ठीमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.
अकराव्या वर्गात शिकणार्‍या एका विद्यार्थिनीने लैंगिक छळ झाल्यामुळे आत्महत्या केली. ही घटना चेन्नईच्या पूनमल्ली भागात घडली. या मुलीनं आत्महत्या करण्यापूर्वी एक भावनिक चिठ्ठी लिहिली आहे. यामध्ये तिने तिच्या एकाकीपणाबद्दल, तिच्यासोबत घडलेल्या अत्याचाराबद्दल आणि या अत्याचारातून सावरत असताना शाळा किंवा तिचे नातेसंबंध कसे सुरक्षित ठरले नाहीत, याबद्दल लिहिलं आहे. पीडितेच्या घरात सापडलेल्या सुसाईड नोटवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या मुलीनं सुसाईड नोटमध्ये आईचा गर्भ आणि कबर ही दोनच सुरक्षित ठिकाणे आहेत, असं लिहिलंय. ही मुलगी सरकारी शाळेत अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. तिची आई घराबाहेर पडल्यानंतर तिने आत्महत्या केली. आई घरात परत आल्यानंतर तिला ही घटना समजली. मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी एका खासगी शाळेत नववी पर्यंत शिकत होती. खासगी शाळेतील शिक्षकाच्या मुलाने तिचा छळ केल्याचे तिने पालकांनी सांगितले. त्यानंतर तिला त्या शाळेतून काढून दुसर्‍या शाळेत टाकण्यात आले. या लैंगिक छळाच्या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

COMMENTS