छत्रपतींचा अवमान ; राज्यात शिवप्रेमींचा उद्रेक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपतींचा अवमान ; राज्यात शिवप्रेमींचा उद्रेक

बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरूमध्ये शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर त्या

बेडरूममध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट, एक जणाचा मृत्यू | LOK News 24
शोधून काढणाऱ्यास कोंबडी बक्षीस | LOKNews24
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम 35 टक्के पूर्ण

बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरूमध्ये शनिवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाची विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रासह कर्नाटकात उमटले. नंतर मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी कानडी व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यास सांगितले. व्हिडिओ मध्ये व्हायरल होत असलेला बंगळुरुतील एका चौकातील हा पुतळा आहे, त्याची गुरूवारी रात्री विटंबना करण्यात आली. त्या घटनेचे चित्रिकरण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. त्यानंतर हळूहळू त्या घटनेचे पडसाद उमटायला लागेल आहेत.
शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली असून बेळगाव, सांगलीमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. बेळगावात संतप्त जमावाने क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना केली असून असून दगडफेक व तोडफोडीच्या घटनाही शहरात घडल्या आहेत. तणावाची स्थिती लक्षात घेत बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनाप्रकरणी बेळगावात शनिवारी सकाळपासून जमावबंदी आदेश जारी केला आहे. शहरात ठिकठिकाणी दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले असून 27 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. आणखी संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. बेळगावसह महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली भागातही त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. कर्नाटकमधून येथे आलेल्या खाजगी वाहनांवर शिवसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली. सदाशिनगर बंगळूर येथे शिवाजी राजांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतून राजांचा अवमान करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर शिवप्रेमीमधून एकच संताप व्यक्त झाला. तसेच अनगोळ येथील संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची अज्ञातांनी विटंबना केलीय. याच तणावाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्रीपासूनच कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केले असून खबरदारी म्हणून शहर आणि तालुक्यात कलम 144 अनुसार जमावबंदीचा आदेश पोलिस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी जारी केला आहे. बेळगावात शुक्रवारी रात्री काही संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत 20 हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. बेळगावमधील धर्मवीर संभाजी चौकात जमून सर्व रस्ते बंद केले. धर्मवीर संभाजी चौकात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. रामदेव गल्ली व इतर ठिकाणी दगडफेक करण्यात आली. तर रात्री काही अज्ञातांकडून क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचीही विटंबना झाल्याची माहिती आहे. क्रांतीवीरांच्या गळ्याभोवती लाल-पिवळा झेंडा गुंडाळला असून हात कापडाने बांधले आहेत. त्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याने खबरदारी म्हणून शहर आणि तालुक्यात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

विटंबना छोटी गोष्ट : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याचे धक्कादायक विधान
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक विधान केलंय. विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं विधान बोम्मई यांनी केल्यानं आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत. महाराष्ट्रभरातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.

शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही ः मुख्यमंत्री ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत, तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक कारवाई करण्यास सांगावे, अशा तीव्र शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ठाकरे म्हणाले, बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबाबत अघटीत घडले आहे, तर त्याची कसून चौकशी करायलाच हवी. या प्रकाराकडे डोळेझाक करू नका.

COMMENTS