दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहोचविण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस पोहोचविण्याच्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई : जव्हारसारख्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतुकीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच पालघर जिल्ह

कडाक्याच्या थंडीत आ.बच्चु कडू यांचे कापडाच्या पालघरात राहून आंदोलन 
माथेरानमधील पर्यटन उद्यापासून सुरू
दरेकरांमुळे ठाकरेंना कोकणात जावे लागले…; भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा दावा

मुंबई : जव्हारसारख्या दुर्गम भागात ड्रोनद्वारे लस वाहतुकीचा यशस्वी प्रयोग करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे तसेच पालघर जिल्हा प्रशासनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांची देशपातळीवर प्रथमत: अंमलबजावणी करत महाराष्ट्राने नेहमीच आपले पाऊल पुढे टाकले आहे. ड्रोनद्वारे लस वाहतुकीच्या या उपक्रमाने दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांची आरोग्य रक्षणाची वाट अधिक प्रशस्त आणि सोपी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणतात.
आधुनिक तंत्रज्ञानाचा जनहितासाठी किती उत्तमपणे उपयोग करून घेता येतो याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी कर्तव्याप्रति समर्पित राहून एका वेगळ्या ऊर्जेने काम केल्याबद्दल तसेच सर्वसामान्यांची आरोग्य सुविधा प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत वेगाने पोहोचवल्याबद्दल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रदीप व्यास, पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांच्यासह आरोग्य विभागातील तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. जव्हार स्टेडियम ते प्राथमिक आरोग्य केंद्र झापमधील अंतर २५ कि.मी आहे. जिथे रस्त्याने हे अंतर पार करण्यासाठी अंदाजे एक तासाचा कालावधी लागतो तिथे ड्रोनच्या सहाय्याने केवळ ९ मिनिटात कोविशिल्ड लसीचे ३०० डोस प्राथमिक आरोग्य केंद्र झाप येथे पाठविण्यात आले. एवढेच नव्हे तर यातून लगेचच ३०४ नागरिकांचे लसीकरणदेखील करण्यात आले. हा नाविन्यपूर्ण उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाने ब्ल्यू इन्फिनिटी इनोव्हेशन लॅब आणि आय आय एफ एल फाऊंडेशनच्या मदतीने यशस्वीरितीने पूर्ण केला. यामुळे लसीची शीतसाखळी अबाधित राखणे, प्रवासादरम्यान होणाऱ्या वेळ आणि श्रमाची बचत होण्यास मदत झाली आहे. ड्रोनच्या सहाय्याने झालेली लस वाहतूक हे एक पथदर्शी उदाहरण आहे, याबरोबरच भविष्यात औषध, रक्त पुरवठ्यासह अवयव प्रत्यारोपणाच्या कामालाही एक नवी दिशा मिळणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

COMMENTS