वाढते दहशतवादी हल्ले चिंताजनक

Homeताज्या बातम्यासंपादकीय

वाढते दहशतवादी हल्ले चिंताजनक

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया चिंताजनक असून, त्या रोखण्याच्या दृष्टीने कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या काही मह

अखेर सरकारला जाग आली !
मराठा-ओबीसींतील तणाव !
नक्षलवाद्यांचा बिमोड !

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाद्यांच्या वाढत्या कारवाया चिंताजनक असून, त्या रोखण्याच्या दृष्टीने कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या काही महिन्यांतील जम्मू-काश्मीर भागातील दहशतवादी आणि सीमा सुरक्षा दलामध्ये होणार्‍या चकमकी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अफगाणिस्तामध्ये तालिबानी सैन्यांनी सत्तांतर घडवून आणल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठया प्रमाणावर अवैध शस्त्रसाठा दाखल होत असून, त्याचा वापर दहशतवादी कारवायासाठी केला जात असल्याचे आता लपून राहिलेले नाही. कालच पोलिसांच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी केलेल्या अद्याधुंद गोळीबारात चार पोलिस जवान शहीद झाले आहेत. श्रीनगर इथून बस पोलीस हेडक्वार्टरला जात असताना दहशतवाद्यांनी बसवर बेछुट गोळीबार केला. या हल्ल्यात 14 पोलीस जखमी झालेत. सर्व जखमी पोलिसांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी जखमींपैकी 4 जवानांना मृत घोषित करण्यात आले. श्रीनगरातील पंथा चौक-खोनमोह मार्गावर पोलिसांच्या चालत्या बसवर दहशतवाद्यांनी बेछुट गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी तपासणी सुरु करण्यात आली आहे.
या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा वाढत्या दहशतवाद्यांची समीक्षा करणे गरजेचे आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांतील चित्र बघितले तर दहशतवाद्यांनी आपले हात पाय पसरायला सुरूवात केली आहे. दिल्लीमध्ये देखील 15 ऑगस्टच्या वेळी हल्ला करण्याच्या तयारीत होती. मात्र गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या संदेशातून दहशतवाद विरोधी पथकांनी हा हल्ला उधळून लावत या दहशतवाद्यांना ताब्यात घेतले. मात्र तरी देखील जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया कमी झालेल्या नाहीत. जगभरात सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांपैकी 12 दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये आहेत. शिवाय दहशतवादी संघटना सातत्याने नाव बदलत, असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकन संस्था काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. या 12 संघटनांपैकी पाच संघटनांचे लक्ष्य भारत असल्याचे म्हटले गेले आहे. सीआरसीच्या अहवालानुसार, अमेरिकेतील अधिकार्‍यांनी पाकिस्तानमधील अनेक दहशतवाद्यांचे तळ, त्यांना संचलित करणार्‍या संघटनांची ओळख पटवली आहे. यातील काही संघटना वर्ष 1980 पासून पाकिस्तानमध्ये सक्रिय आहेत. या अहवालानुसार, लष्कर-ए-तोयबाची स्थापना वर्ष 1980 मध्ये पाकिस्तानमध्ये करण्यात आली होती. तर, वर्ष 2001 मध्ये ही संघटना जागतिक दहशतवादी संघटना म्हणून ओळखली जाऊ लागली. सन 2008 मध्ये या दहशतवादी संघटनेने मुंबईत भीषण दहशतवादी हल्ला केला. त्याशिवाय अनेक दहशतवादी कारवाया या संघटनेने केल्याचे अहवालात म्हटले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची स्थापना 2002 मध्ये करण्यात आली. मसूद अझहर या दहशतवाद्याने याची स्थापना केली. जैश-ए-मोहम्मदने भारतात अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढून असेल, तर प्रथम पाकिस्तानची आर्थिक कोंडी करणे होय. कारण पाकिस्तान आपल्या देशात दहशतवाद्यांना संरक्षण देत असल्याचे लपून रााहिलेले नाही. त्यामुळे या दहशतवादी हल्ल्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. जम्मू-काश्मीरमध्ये अचानक वाढलेल्या दहशतवादी कारवायांमुळे मोदी सरकारने वूश 370 हटवल्यानंतर केलेले सर्व दावे निरर्थक ठरले आहेत. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवले. त्यानंतर अनेक वेळा सरकारमधील बहुतेक मंत्र्यांनी, इतकंच काय तर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुद्धा जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपेल, असा दावा केला होता. वर्तमानकाळात वाढलेल्या दहशतवादी कारवायांवरून असं दिसून येते की, गेल्या दीड-दोन वर्षांत दहशतवाद्यांच्या कारवायात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. भले काहीही होवो, पण पाकिस्तानची सीमेपलीकडील दहशतवादाची रणनिती कायम आहे. सूडभावनेने मोठ्या प्रमाणात हानी करण्याच्या योजना पाकिस्तानी लष्कराच्या कार्यालयांमध्ये आखलेल्या असू शकतात.

COMMENTS