नगरच्या उपनगरात…पोलिसाच्या घरी चोरीचा प्रयत्न

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरच्या उपनगरात…पोलिसाच्या घरी चोरीचा प्रयत्न

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरासह उपनगरात चोरीच्या गुन्ह्यांची वाढ झाली आहे. शहरात पोलिस संख्याबळ कमी असल्याने व पोलिसांवर अन्य कामाचा ताण असल्याने चोरट

बेलापूर महाविद्यालयात कॅम्पस प्लेसमेंट उत्साहात
प्रा. राम शिंदे यांच्यावर बोलण्या अगोदर दहा वेळा आरसा पहावा
मढीत मानाची होळी पेटवत कानिफनाथ यात्रेला सुरूवात

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरासह उपनगरात चोरीच्या गुन्ह्यांची वाढ झाली आहे. शहरात पोलिस संख्याबळ कमी असल्याने व पोलिसांवर अन्य कामाचा ताण असल्याने चोरट्यांनी थेट पोलिसांच्याच घरी घरफोडी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ही घटना उपनगरातील नगर-दौंड रोडवरील हनुमाननगर येथे घडली.
बुरूडगाव येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम असल्याने मोकाटे वस्तीवरील मोकाटे कुटुंब जागरण गोंधळाकरिता गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व आतील सामानाची उचकापाचक केली. यावेळी बाळासाहेब कोकाटे यांच्या मुलाने पाहिले असता त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा जवळच असलेल्या हनुमाननगरकडे वळवला. तेथे राहत असलेले पोलिस नाईक पवार हे रात्री कुटुंबासह जेवण करून झोपलेले असता मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागे बेडरूमची खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. ती उघडताना दरवाजाला बांधलेल्या वायरी कट केल्या व आत पाहिले असता बेडरूमचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने त्यांनी बंगल्याच्या किचनरूम खिडकीचे ग्रील कटावणीच्या साह्याने उचकटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घराच्या बाहेरील बाजूस असलेला लाईटचा बल्ब फोडला व प्लॅस्टिकचे भांडे घरापासून लांब नेऊन ठेवले. प्लास्टिकचा ड्रम किचन रूमच्या बाहेरून खिडकीजवळ ठेवून त्यावर उभे राहिले व कटावणी सहाय्याने ग्रील उचकटले परंतु कुत्र्यांच्या अखंड भुंकण्याने नागरिक जागे होतील या भीतीने तेथे चोरी न करता पळून गेले. सकाळी खिडकीचे ग्रील तुटलेले दिसल्याने चोरटे आपल्याच घरी आले असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. सुदैवाने काहीही चोरीस गेले नाही. याप्रकरणी पोलीस नाईक पवार यांचा मुलगा आदित्य प्रमोद पवार (वय 27) यांच्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहे.

COMMENTS