श्रीरामपुरात बिबट्याचा रंगला थरार, आठ जखमी; वन विभाग व पोलिसांनी केले जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपुरात बिबट्याचा रंगला थरार, आठ जखमी; वन विभाग व पोलिसांनी केले जेरबंद

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूर शहराच्या दक्षिण भागात असलेल्या वॉर्ड नंबर 7मधील मोरगेवस्तीवर रविवारी (5 डिसेंबर) बिबट्याचा थरार रंगला. लोकवस्तीत आलेल्

रस्त्याच्या मधोमध वाहन उभे करणार्‍या वाहन चालकावर गुन्हा
आमदार काळेंच्या पुढाकारातून कोपरगावची बाजारपेठ फुलणार
Kopargoan : आमदार आशुतोष काळेंनी दिला भरघोस निधी l Lok News24

अहमदनगर/प्रतिनिधी : श्रीरामपूर शहराच्या दक्षिण भागात असलेल्या वॉर्ड नंबर 7मधील मोरगेवस्तीवर रविवारी (5 डिसेंबर) बिबट्याचा थरार रंगला. लोकवस्तीत आलेल्या या बिबट्याने तब्बल 8जणांना जखमी केले. अखेर वनविभाग व पोलिसांनी त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले.
श्रीरामपुरातील बेलापूर रोड व संगमनेर रोड याच्या मधोमध मोरगे वस्ती परिसर आहे. या वस्तीचा पाठीमागील भाग काहीसा जंगलसदृश्य आहे. रविवारी सकाळी मोरगे वस्ती येथील सदावर्ते हॉस्पिटल जवळील असणार्‍या लोकवस्तीत बिबट्या येऊन त्याने ऋषभ अंबादास निकाळजे नावाच्या बालकास जखमी केल्याची घटना घडली होती. बिबट्या आल्याची माहिती मिळताच पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके यांनी पोलिस फौजफाट्यासह तसेच वनविभागाच्या उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी वन विभागाच्या पथकासह घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिक व वैदू समाजाच्या धाडसी तरुणांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले. बिबट्यास जेरबंद करत असताना आठ व्यक्तींवर झडप घालून बिबट्याने त्यांना जखमी केले. पोलिस अधिकारी, अंमलदार, स्थानिक नागरिक व बिबट्या यांच्यात झटापटीचा सामना सुरू होता. नुसता धुमाकूळ व पळापळ सुरू होती. अखेर जवळपास एक तासाच्या अथक परिश्रमानंतर वन विभागाच्या पथकाने बिबट्यास बेशुध्द होण्याचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात यश मिळवले. या कारवाईने श्रीरामपूरच्या जनतेने सुटकेचा निःश्‍वास टाकला असून पोलिस उपअधीक्षक मिटके, पोलिस निरीक्षक सानप, इतर पोलिस अधिकारी व अंमलदार, वनविभागाच्या उपवनसंरक्षक माने, वनक्षेत्रपाल प्रतिभा सोनवणे, संगमनेर उपवन विभाग रेस्क्यू टीम यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

COMMENTS