बायोडिझेल घोटाळा प्रकरणातील साबळे वाटेफळच्या गुन्ह्यात वर्ग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बायोडिझेल घोटाळा प्रकरणातील साबळे वाटेफळच्या गुन्ह्यात वर्ग

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील केडगाव शिवारात बाह्यवळण रस्त्यावर बायोडिझेल विकणार्‍या टोळीवर कोतवाली पोलिस व पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई केली

शेवगाव तहसिलवर जनशक्ती विकास आघाडीचा मोर्चा
थोरात व कोल्हे समर्थकांनी घेतली खा. शरद पवारांची भेट
गौतमच्या मुलींनी गाजवले व्हॉलीबॉलचे मैदान

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर तालुक्यातील केडगाव शिवारात बाह्यवळण रस्त्यावर बायोडिझेल विकणार्‍या टोळीवर कोतवाली पोलिस व पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई केली होती. यात शिवसेनेचे शहर प्रमुख व माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांच्यासह 22 आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. या गुन्ह्यातील आरोपी संजय साबळे याला वाटेफळ (ता.नगर) या ठिकाणच्या बायोडिझेल विक्रीच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. साबळे यास न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

अहमदनगर शहराजवळून जाणार्‍या बाह्यवळण रस्त्यावर दक्षिण राज्यातील भाषेत खुलेआम बायोडिझेल विक्रीचे फलक लावण्यात आले होते. या राज्यातील ट्रक चालकांना डिझेलऐवजी बायोडिझेल इंधन म्हणून स्वस्तात विकले जात होते. जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून बायोडिझेलची अवैध विक्री करणार्‍यांवर कारवाई केली होती. पुरवठा आणि कोतवाली पोलिसांनी केडगावात पकडलेल्या बायोडिझेल प्रकरणात 22 आरोपींची नावे निष्पन्न झाले आहेत. शिवसेना शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक दिलीप सातपुते यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, नगर ग्रामीण पोलिस उपविभाग आणि पुरवठा विभागाने वाटेफळ (ता. नगर) येथे छापा टाकला होता. या कारवाईत बायोडिझेल, रोख रक्कम, टँकर, ट्रक, कार असा एक कोटी 75 लाख 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात आतापर्यंत 11 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडे केलेल्या चौकशीमध्ये आणखी काही नावे निष्पन्न झाली आहे. केडगाव गुन्ह्यातील आरोपी संजय साबळे याचा वाटेफळ प्रकरणात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तो सध्या केडगावच्या गुन्ह्यात कोतवालीच्या ताब्यात होता. त्याला वाटेफळच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

COMMENTS