Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूर पालिका निवडणूकीत प्रभाग 10 मध्ये शिवसेनेला तगडे आव्हान

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. गत पालिका निवडणुकीत प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादीचे शि

गुरुकुल स्कूल ठरली संपूर्ण लसीकरण करणारी सातारा जिल्ह्यातील पहिली शाळा
दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिकावर कारवाई
सडा वाघापूरजवळ अल्टो कार तीनशे फूट दरीत कोसळली : एकजण जखमी

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. गत पालिका निवडणुकीत प्रभाग 10 मध्ये राष्ट्रवादीचे शिवाजी पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने हा प्रभाग शिवसेनेच्या ताब्यात गेला आहे. आता मात्र, शिवाजी पवार यांनी स्वतः व आपले दोन ते तीन उमेदवार उभा करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे प्रभाग 10 मध्ये शिवसेनेला शिवाजी पवार यांचे तगडे आवाहन उभे राहणार आहे.
उरुण परिसरात कधीही शिवसेनेचा उमेदवार निवडून आला नाही. मात्र, गतपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे शिवाजी पवार यांच्या मातोश्रींचा उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने प्रभाग 10 मध्ये राज्यात पहिल्यांदा नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले होते. या प्रभागातून शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक निवडून आले. गेल्या पाच वर्षात या प्रभागात शिवसेनेने म्हणावे, असे विकासात्मक काम केले नाही. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांतून शिवसेनेविषयी नाराजीचा सूर येत आहे.
आगामी पालिका निवडणुकीसाठी वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे सचिव अ‍ॅड. धैर्यशील पाटील, शहर युवक राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अभिजित पाटील व माजी नगरसेवक शिवाजी पवार यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शिवाजी पवार यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये सामील झाले होते. पवार यांना भाजप दिलेली आश्‍वासने पूर्ण केले नाहीत. भाजपकडून त्यांच्या पदरी निराशा पडली असल्याने पवार हे पुन्हा हातात घड्याळ बांधणार का? हा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
शिवाजी पवार यांचे एकगठ्ठा मतदान असल्याने प्रत्येक निवडणुकीत त्यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. पवार यांनी प्रभाग 10 किंवा प्रभाग 2 मधून कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे अजून गुलदस्त्यात आहे. मात्र, शिवाजी पवार समर्थकांनी प्रभाग 10 मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. एकंदरीत शिवाजी पवार यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपची डोकेदुखी वाढणार आहे, हे मात्र निश्‍चित.
इच्छुकांचे विक्रमभाऊ पाटील यांच्याशी संपर्क
आगामी पालिका निवडणुकीत विकास आघाडीचीच सत्ता येणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही तरी विकास आघाडीतून उमेदवारी मिळविण्यासाठी विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रमभाऊ पाटील यांच्याशी संपर्क साधला जात आहे. विक्रमभाऊ पाटील यांनी कोणालाही कोणताही शब्द, आश्‍वासन दिले नसल्याचे समजत आहे. मात्र, इच्छुकांनी विक्रमभाऊ यांच्यासोबत गुप्त बैठकां घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या बैठकीना चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

COMMENTS