शेतीतील मागासलेपण सहकार क्षेत्रच दूर करु शकते : गडकरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतीतील मागासलेपण सहकार क्षेत्रच दूर करु शकते : गडकरी

मुंबई : शेती क्षेत्रातील मागासलेपण दूर करण्यासाठी सहकार क्षेत्र महत्वपूर्ण योगदान देऊ शकते, ज्या गावांमध्ये सहकार क्षेत्र कार्यरत आहे, तेथील लोकांचे

कोरोनानंतर आता आला नोरोव्हायरचं संकट ; सापडले २ रुग्ण | LOK News 24
जातीव्यवस्थेला मुठमाती देऊया! 
जम्मू-काश्मीर भुसुरूंग स्फोटात दोन जवान शहीद

मुंबई : शेती क्षेत्रातील मागासलेपण दूर करण्यासाठी सहकार क्षेत्र महत्वपूर्ण योगदान देऊ शकते, ज्या गावांमध्ये सहकार क्षेत्र कार्यरत आहे, तेथील लोकांचे दरडोई उत्पन्नही जास्त आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 110 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या बँकेचे संस्थापक आणि बँकेच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणार्‍या विठ्ठलदास ठाकरसी, वैकुंठभाई मेहता आणि धनंजय गाडगीळ यांच्या तैलचित्रांचे अनावरण नितीन गडकरी, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आले, त्यावेळी गडकरी बोलत होते. उन्नती करणे हा सहकार क्षेत्राचा मुख्य उद्देश आहे मात्र त्याचबरोबर या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे असे ते म्हणाले. या बँकेची स्थापना झाली त्यावेळी देशासमोर गरिबी, बेरोजगारी अशी अनेक आव्हाने होती. गरिबी, उपासमारी आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी सहकार क्षेत्र महत्वाचे ठरले आहे , असे त्यांनी सांगितले. आगामी काळात सहकारी बँकिंगला अधिक नफा मिळण्याच्या दृष्टीने गडकरी यांनी सहकारी स्टॉक एक्सचेंजला मान्यता देण्याची विनंती केली. खासदार शरद पवार म्हणाले की, या बँकेने राज्यातील विविध घटकांना मदत केली असून शेती, व्यवसाय, शेतकरी या सर्वांना या बँकेचे सहकार्य लाभले आहे, असे सांगत ,सहकार क्षेत्रात आपल्याला आणखी पुढे जायचे आहे आणि समाजातील शेवटच्या घटकाला या माध्यमातून सक्षम करायचे आहे, असे पवार म्हणाले.

COMMENTS