घराणेशाहीची संस्थाने सत्तास्थानापासून खालसा करण्यासाठी डिच्चू कावा प्रभावी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घराणेशाहीची संस्थाने सत्तास्थानापासून खालसा करण्यासाठी डिच्चू कावा प्रभावी

अहमदनगर (प्रतिनिधी)-  देशातील भ्रष्ट लोकप्रतिनिधी व सत्ताधार्‍यांना घरचा रस्ता दाखवून लोकशाहीचे शुद्धीकरण करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनस

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
राष्ट्रीय सहकार धोरण आणि सरकारमुळे विकास प्रक्रियेत अधिक गतिमानता ः विवेक कोल्हे
राहुरी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांची रावळगाव येथील पवार बंधुंच्या प्रक्षेत्रास भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

देशातील भ्रष्ट लोकप्रतिनिधी व सत्ताधार्‍यांना घरचा रस्ता दाखवून लोकशाहीचे शुद्धीकरण करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने हसत खेळत डिच्चू कावा तंत्राच्या प्रसारासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. दिवाळीपासून कबड्डी खेळाच्या माध्यमातून हे तंत्र घराघरात पोहचविण्याचा संघटनेचा उपक्रम असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

 डिच्चू कावा तंत्राने मागच्या दाराने सत्तेत आलेले डल्लाडोंगर लोकप्रतिनिधी व मला काय त्याचे ? ही भावना असणार्‍या ढब्बू मकात्यांना कायमचे संपविण्यासाठी ही मोहिम आहे. संघटनेने  डिच्चू कावा तंत्राच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी सत्ता राबविणार्‍या लोकप्रतिनिधींना जनतेने जवळ करावे, तर मतदारांची फसवणुक करणार्‍यांना कायमचा घरचा रस्ता दाखविण्यासाठी  डिच्चू कावा तंत्र स्विकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

देशभरात कबड्डी खेळ प्रसिद्ध असून, या खेळाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जागृती केली जाणार आहे. कबड्डीचा सामना घेऊन डिच्चू कावा तंत्राची माहिती दिली जाणार आहे. यापुढे मतदारांना मतकोंबाड बनवून किंवा त्यांच्या खात्यात पैसे टाकून मतदान करून घेणार्‍या डल्लाडोंगर उमेदवारांना कायमचा वचक बसणार आहे. त्यामुळे लोकांसाठी काम करणार्‍या उमेदवारांना प्राधान्य राहील व हसत-खेळत लोकशाही बळकट करण्याचा हा प्रयत्न असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशभरातील संस्थाने खालसा करण्यासाठी या डिच्चू काव्याचा वापर केला. त्याच पद्धतीने स्वातंत्र्योत्तर काळात देशभरात नवीन घराणेशाहीची संस्थाने सत्तास्थानापासून खालसा करण्यासाठी डिच्चू कावा प्रभावी ठरणार आहे. या तंत्राने लोकांना आपल्या भागात किंवा राज्यात मागच्या दाराने सत्ता मिळवणारे डल्ला डोंगर कोण आहेत? त्यांना मदत करणारे कोण? याची जाणीव होणार आहे. यापुढे सर्वसामान्यांची कामे करणारे लोकप्रतिनिधी निवडून येण्यास व भ्रष्ट उमेदवारांना सत्तेपासून अलिप्त ठेवण्यास मदत होणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

COMMENTS