शिवभोजन चालक व कामगारांची दिवाळी अंधारात साजरी होण्याची वेळ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवभोजन चालक व कामगारांची दिवाळी अंधारात साजरी होण्याची वेळ

अहमदनगर (प्रतिनिधी)-  गोर-गरीब भुकेलेल्यांचे अत्यल्प दरात पोट भरणार्‍या शिवभोजन चालक व कामगारांची दिवाळी अंधारात साजरी होण्याची वेळ ओढवली असताना र

मानोरीच्या चोरीत आरोपी निघाला नात्यातील
त्या निकालाचे न्यायालयाने मूल्यमापन करावे; सीबीआय संचालक मुदतवाढ याचिका
लोकशाहीसाठी मतदान करण्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचे ढाकणवाडी गावाला आवाहन..

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

गोर-गरीब भुकेलेल्यांचे अत्यल्प दरात पोट भरणार्‍या शिवभोजन चालक व कामगारांची दिवाळी अंधारात साजरी होण्याची वेळ ओढवली असताना राज्य सरकारने चालकांची बिले अदा करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती आरपीआयचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख यांनी दिली.

महाराष्ट्रातील गोर-गरीब जनता व हातावर पोट असलेले कामगार उपाशी राहू नये, या भावनेने राज्य सरकारने शिवभोजन योजना राबवली. यामध्ये अत्यल्प दरात गरजूंना भोजन उपलब्ध करुन देण्यात आले असून, यासाठी लागणारा खर्च राज्य सरकार  शिवभोजन चालकांना अदा करत आहे. मात्र काही महिन्यापासून भोजन चालकांचे बिले मिळाले नसल्याने त्यांना हा प्रकल्प चालवणे, कामगारांचे पगार देणे व वाढलेल्या महागाईत नियोजन करणे अवघड बनले आहे.

महागाईमुळे कडधान्य, गहू, तांदूळ, हिरवे पालेभाज्या व गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असताना त्याचा दैनंदिन खर्च पेळवणे शिवभोजन चालकांना अवघड जात आहे. काहींनी हे प्रकल्प भाड्याने जागा घेऊन सुरु केले असून, त्यांची तारेवरची कसरत सुरु आहे. दिवाळी तोंडावर आली असताना अद्यापि शिवभोजन चालकांचे बिले देण्यात आलेले नसून, त्यांची व या केंद्रातील कामगारांची दिवाळी अंधारातच साजरी होणार आहे. गोरगरिबांचे पोट भरणारे शिवभोजन चालक व कामगार यांच्यावरच उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

शिवभोजन चालकांच्या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांची बिले तातडीने अदा करण्याची मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा शिवभोजन चालकांसह संघटनेच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS