टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावे लागेल: संजय राऊत (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावे लागेल: संजय राऊत (Video)

आज टणाटणा उड्या मारणाऱ्यांनी खुशाल उड्या माराव्यात. एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. यांना घरातच बाथरुममध्ये तोंड लपवून बसावे लागेल अशा

2024 ला सरकार बदलेल,सगळ्यांचा हिशोब हा केला जाईल
केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न
केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही

आज टणाटणा उड्या मारणाऱ्यांनी खुशाल उड्या माराव्यात. एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. यांना घरातच बाथरुममध्ये तोंड लपवून बसावे लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतो. असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. महाराष्ट्रात कायम चांगलं राजकारण होतं. आता ते बिघडवलं जात आहे. त्याची जबाबदारी भाजपवर राहणार आहे. आज ते हे सर्व पाहून टणाटणा उड्या मारत आहेत. पण एक दिवस त्यांना तोंड लपवून फिरण्याची वेळ येईल. काही लोकं म्हणतात दिवाळी नंतर असं करू तमूक करू. पण या सर्वांना बाथरुममध्ये तोंडं लपवून बसावे लागेल अशा प्रकारचे स्फोट दिवाळीनंतर होऊ शकतात, तुमच्या कुटुंबापर्यंत पोहोचायचे का? असा सवाल राऊत यांनी केला.

COMMENTS