Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस देशपातळीवरील 4 सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

सातारा / प्रतिनिधी : बँकिंग फ्रंटिअर्स ही एक राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी मल्टी प्लॅट फॉर्म मिडिया कंपनी आहे. त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रात क

उत्तराखंड, केरळमध्ये मुसळधार; महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना ’यलो’ अलर्ट
विमा कपंनीच्या प्रतिनिधींनी पैशांची मागणी केल्यास तक्रार करा : भाग्यश्री फरांदे
‘सोनहिरा’ च्या अध्यक्षपदी आमदार मोहनराव कदम बिनविरोध

सातारा / प्रतिनिधी : बँकिंग फ्रंटिअर्स ही एक राष्ट्रीय स्तरावरील अग्रणी मल्टी प्लॅट फॉर्म मिडिया कंपनी आहे. त्यांचे माध्यमातून बँकिंग क्षेत्रात कामकाज करत असलेल्या संस्थांनी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाची दखल घेवून त्या संस्थांचा पुरस्कार देवून गौरव केला जातो. बँकिंग क्षेत्रात होत असलेले विविध तांत्रिक बदल व चालू घडामोडींचा आढावा घेवून बँकिंग फ्रंटिअर्स मासिकांचे माध्यमातून माहिती बँकांपर्यंत पोहोचविणेचे उल्लेखनीय कामकाज करते.
या संस्थेमार्फत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस प्रमुख करंडकासह 4 सर्वोत्तम पुरस्कार मिळाले. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट डिजिटल बँक, सर्वोत्कृष्ट एनपीए व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट कोव्हिड रिलीफ पॅकेज व सर्वोत्कृष्ट ऑडीट इनिशिएटिव्ह असे चार पुरस्कार खा. डॉ. भागवत कराड यांचे हस्ते आणि वित्त विभागाचे अतिरिक्त सचिव संजीव कौशिक, नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आणि क्रेडिट सोसायटी लि. दिल्लीचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, बँकिंग फ्रंटिअर्स मुख्य कार्यकारी अधिकारी बाबू नायर, मनोज अग्रवाल व भरत सोळंकी यांचे प्रमुख उपस्थितीत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे व विविध विभागांचे अधिकारी यांनी पुरस्काराचा स्वीकार केला.
याप्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक व विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकर्‍यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतकांच्या सदिच्छा यामुळे बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे.
बँकेचे अध्यक्ष आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, बँकेने सर्वसामान्य शेतकर्‍याला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत. बँकेने राखलेला शुन्य टक्के एनपीए, 100% कर्ज वसुली, उत्तम व्यवस्थापन, नाबार्ड व आरबीआयचे नियमांचे काटेकोर पालन तसेच बँकींग व्यवसायातील विविध रेशो बँकेने राखले आहेत. बँकेने सीबीएस प्रणाली, मोबाईल बँकिंग, किसान पे अ‍ॅप, भिम अ‍ॅप ग्राहकांना देवून क्रांती केली आहे. या पुरस्कारामुळे बँकेचे ठेवीदार, हितचिंतक, कर्जदार व सभासदांनी बँकेच्या गुणवत्तापूर्वक यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले.

COMMENTS